मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) मार्गरेषेमुळे बाधित होणा-या बोरिवली येथील जोडरस्त्याच्या पश्चिम बाजूकडील ३० बांधकामांचे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आर उत्तर विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम विविध सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे.पॅकेज एफ मध्ये ३.४७ लांबीच्या गोराई आंतरबदल ते दहिसर आंतरबदल (उन्नत मार्ग) विकास कामाचा अंतर्भाव आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) समुद्र व नदीच्या पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मलजलाची गुणवत्ता सुधारून जल प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने मुंबई ...
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) मार्गरेषेमुळे बोरिवली येथील जोडरस्त्याच्या पश्चिम बाजूकडील ३० बांधकामे बाधित होत आहेत. उप आयुक्त (परिमंडळ - ७) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (आर उत्तर) यांच्या नेतृत्वाखाली आर उत्तर विभागाच्यावतीने या बांधकामांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचे ५ अभियंते, २० कर्मचारी यांच्या सोबत २ पोकलेन संयंत्र, २ जेसीबी संयंत्र, ३ डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यावेळी तैनात होते.