भारतीय वंशाच्या नावनेथम नावी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार, त्यांची निवड कशी झाली? जाणून घ्या

भारतीय वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना 2026 नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नावी पिल्लई या दक्षिण अफ्रिकेतील एक प्रख्यात कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांची या पुरस्कारासाठी कशी निवड झाली आणि का ते जाणून घ्या

नोबेल शांताता 2026 पुरस्कार कोणाला मिळणार? याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून होती. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पुरस्कारासाठी आग्रही होते. त्यामुळे या पुरस्काराच्या नावाची चर्चा रंगली होती. अखेर या नावाची घोषणा झाली आहे. भारतीय वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 287 उमेदवार आणि संघटनांच्या शर्यतीत त्यांच्या नावाची निवड झाली. स्पर्धकांची संख्या पाहता ही शर्यत काही सोपी नव्हती. त्यामुळे त्यांची निवड होण्याचं कारणंही तसंच असणार हे नक्की.. नावी पिल्लई या दक्षिण अफ्रिकेतील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आहेत. वर्णभेदाच्या काळात कार्यकर्त्यांसाठी खटले लढण्यापासून ते आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये न्यायाधीश बनण्यापर्यंत आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुख होण्यापर्यंत त्यांनी कार्य केले आहे. आता त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 1967 मध्ये पिल्लई या नेटालमध्ये वकिली सुरू करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. त्या काळात वर्णभेदाची मूळं खोल रुजली होती. त्यासाठी वर्णभेदी सरकारकडून विरोध करणाऱ्या राजकीय संघटना आणि कार्यकर्त्यांचा छळ केला जात होता, त्यांना तुरूंगात टाकलं जात होतं. पण त्यांच्यासाठी पिल्लई उभ्या राहिल्या आणि कायदेशीर लढा दिला.


पिल्लई यांनी 1973 मध्ये त्यांनी राजकीय कैद्यांना वकिलाला भेटण्याचा हक्क मिळवून दिला. 1970 च्या दशकाच्या मध्यात त्यांनी सेठ कूपर आणि स्ट्रिनी मूडली यांसारख्या कृष्णवर्णीय जाणीव चळवळीच्या सदस्यांचा बचाव केला. सामाजिक कार्यात व्यस्त असताना पिल्लई यांनी शिक्षण काही सोडलं नाही. 1982 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी आणि 1988 मध्ये न्यायशास्त्राची डॉक्टरेट मिळवली. इतकंच काय तर नेटाल विद्यापीठात अध्यापन केलं. तसेच डर्बन वेस्टविल विद्यापीठ परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिलं.





1995 मध्य दक्षिण अफ्रिकेच्या उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीश झाल्या. त्याच वर्षी संयुक्त राष्ट्र महासभेने त्यांची आयसीटीआरच्या न्यायाधीश म्हणून निवड केली. तिथे त्यांनी आठ वर्षे सेवा दिली. 1999 ते 2003 कालावधीत अध्यक्ष राहिल्या. सुरूवातीच्या चार वर्षात त्या न्यायाधिकरणातील एकमेव महिला न्यायाधीश होत्या. 1 सप्टेंबर 2008 रोजी त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून निवड झाली. नावी पिल्लई या मूळच्या तमिळ वंशाच्या भारतीय कुटुंबातील आहेत. त्यांचे आजी-आजोबा 1890 च्या दशकात भारतातून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते आणि ते ऊसाच्या मळ्यांमध्ये करारबद्ध मजूर म्हणून काम करत होते.






नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची घोषणा करताना नोबेल पुरस्कार समितीच्या एक्स हँडलवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नावी पिल्लई या आपल्या काळातील आंतरराष्ट्रीय कायदेशीर तत्त्वांच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक आहेत. त्यांची देदीप्यमान कारकीर्द आपल्याला जागतिक स्तरावर कायद्याच्या राज्याला पाठिंबा देण्याची, ते मजबूत करण्याची आणि त्याचा विस्तार करण्याची गरज अधोरेखित करते."

Comments
Add Comment

Smit Machchhar : जखमी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा फोनवर संवाद

हवेत तब्बल 30 हजार फूट उंचीवर फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या धक्कादायक घटनेत भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर

जगभरातील तेल संकटावर G7चा मोठा निर्णय; 100 दशलक्ष बॅरल साठा खुला

ब्रसेल्स : अमेरिकेच्या दबावानंतर जी7 देशांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आपल्या आपत्कालीन साठ्यातून 100

Middle East Tension : सौदी अरेबिया आणि कतारमध्ये अमेरिकेकडून पॅट्रियट क्षेपणास्त्र बॅटरी तैनात

वाशिंग्टन, डीसी : इराणचा समावेश असलेल्या संभाव्य मोठ्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या

Captain Smit Machchhar : धक्कादायक खुलासा! स्मित मछार यांच्यावर चाकूने नाही, तर विमानाच्या 'क्रॅश ॲक्स'ने हल्ला झाला

Captain Smit Machchhar : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानामध्ये थरारक आणि धक्कादायक घटना

Passenger Panic : पायलटच भिडले! फ्लायदुबई विमानात गोंधळ; प्रवाशांचा आरडाओरडा, VIDEO समोर..

तेल अवीव : दुबईहून इस्रायलकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या बोईंग 737 विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये झालेल्या

जपानमधील पब्लिक टॉयलेटची अशी सुविधा पाहून भारतीय महिला म्हणाली, ‘हे लोक इतका विचार कसा करतात ?’

Japan : जपान म्हटलं की शिस्त, स्वच्छता आणि अत्याधुनिक सुविधांची चर्चा हमखास होते. आता जपानमधील पब्लिक टॉयलेटचा एक