मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाजवळ उभारण्यात येत असलेल्या नव्या मनोरा आमदार निवासाच्या दोन्ही इमारती फेब्रुवारी २०२८ पूर्वी सर्व सोयीसुविधांसह आमदारांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. ‘अ’ मनोऱ्याचे सर्व २९ मजले पूर्ण झाले असून, ‘ब’ मनोऱ्याचे ४२ पैकी ३४ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती ...
नव्या आमदार निवासात आमदारांसह त्यांचे स्वीय सहायक, अभ्यागत आणि कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवासासोबतच उपाहारगृहे, वाहनतळ आणि बैठक कक्षांचाही या संकुलात समावेश असेल. त्यामुळे आमदारांच्या निवासाची आणि कामकाजाची व्यवस्था अधिक सुसज्ज करण्याच्या दृष्टीने या वास्तूची उभारणी करण्यात येत आहे.
मुंबई: मुंबई CSMT स्थानकावर तिकिट तपासणी अधिकाऱ्यांनी खोटं ओळखपत्र वापरणाऱ्या चोरट्याला पकडलं आहे. गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबई CSMT स्थानकावर ...
बांधकामाची पाहणी केल्यानंतर प्रा. शिंदे यांनी वास्तूची उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टी यांचा समतोल राखण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. इमारतीचे वैशिष्ट्य जपतानाच तिचा काळजीपूर्वक वापर होईल, यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करावी. यापूर्वी दिलेल्या सूचनांचेही काटेकोर पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
या पाहणीवेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव शिवदर्शन साठ्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर, वास्तुविशारद अतुल प्रभु, एल अँड टीचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश राघवन आणि प्रकल्प सल्लागार फोर्ट्रेस इन्फ्राकॉमचे कैलास उपस्थित होते.