यंदाच्या नवरात्रीत उपवासासाठी करा गरमागरम राजगिऱ्याचे पराठे; पहा पूर्ण रेसिपी

नवरात्रीचे नऊ दिवस भक्त श्रद्धेने देवीची पूजा करतात तसेच उपवासदेखील धरतात. या उपवासासाठी अनेक पदार्थ बनवले जातात त्यातील एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे राजगिऱ्याचे पीठ. राजगिरा पराठा हा राजगिरा पीठ, उकडलेले बटाटे आणि मसाले वापरून बनवलेला एक पौष्टिक पदार्थ आहे. हे राजगिरा पराठे उपवासाच्या काळात बनवल्या जातात. हिंदू धर्मातील उपवासाच्या काळात राजगिरा हा एक महत्त्वाचा घटक म्हणून वापरला जातो. राजगिरा पराठा बनवण्याची रेसिपी पुढीलप्रमाणे:




सर्वात आधी, २ लहान ते मध्यम आकाराचे बटाटे ते पूर्णपणे शिजून स्मॅश करता येण्याइतपत मऊ होईपर्यंत उकडून घ्या.

 

एका वाटीत राजगिऱ्याचे पीठ घ्या.

 

बटाटे हलके गरम असतानाच ते सोलून घ्या. नंतर ते कापा किंवा स्मॅशरने स्मॅश करा आणि राजगिऱ्याच्या पिठात मिसळा. नंतर त्यात एक ते दीड चमचे बारीक कापलेली मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा जिरे पावडर आणि सैंधव मीठ टाका. आवडीनुसार यात बारीक कापलेली कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकतो.

 

सर्व साहित्य नीट एकत्र मिसळा. थोड्या थोड्या मात्रेत यात एक किंवा दोन चमचे पाणी घाला आणि पीठ नरम मळा. पाण्याची मात्रा पिठाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. यामुळे आवश्यकतेनुसार पाणी घाला.

 

त्यानंतर एका सुती कपड्यावर पिठाचा छोटा गोळा घ्या. तळहात किंवा बोटांचा वापर करून पिठाच्या गोळ्यावर हलकेच थाप मारा आणि त्याला एका नीटनेटक्या, गोल आकारात पसरवून घ्या. या पद्धतीमुळे कडा सुबक आणि एकसारख्या राहतात.

 

आता, कापडावरून पराठा अलगदपणे काढून घ्या किंवा कापड उलटे करून गरम तव्यावर ठेवा आणि सुती कापड हळूच वेगळे करा. गॅसची आच मध्यम ते मध्यम-उच्च ठेवा आणि गरजेनुसार ती कमी-जास्त करा.

 

पराठ्याची एक बाजू अर्धी शिजली की,पलटून घ्या. नॉन-स्टिक पॅन किंवा चांगला तापलेला तवा वापरा, अन्यथा पराठा चिकटू शकतो. या बाजूला तूप किंवा तेल लावा आणि मग तो पुन्हा उलटून घ्या.

 

राजगिरा पराठा दोन्ही बाजूंनी समानरीत्या सोनेरी आणि व्यवस्थित भाजला जाईपर्यंत दोन-तीनदा उलटून घ्या. हे राजगिरा पराठे दही किंवा उपवासासाठी बनवलेल्या कोणत्याही भाजीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
Comments
Add Comment

Old Dupatta DIY Hacks : जुने दुपट्टे फेकून देण्याची घाई करू नका! घर सजवण्यासाठी ट्राय करा या ३ सोप्या आणि भन्नाट 'डू इट युअरसेल्फ' आयडिया

महिलांच्या कपाटात (वॉर्डरोब) विविध प्रकारचे, रंगांचे आणि आकर्षक डिझाईन्सचे दुपट्टे असतात. कपड्यांची फॅशन बदलली

‘काला हिरण’ प्रकरणी महत्त्वाची अपडेट, उच्च न्यायालयाने सलमान खानकडून मागवले उत्तर

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान काळवीट प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याच्या ह्या प्रकरणावर

Drishyam Home Tour: 100 वर्षे जुना अन् पोर्तुगाली स्टाईलचं घर, 'दृश्यम' मधील विजय साळगावकरचा बंगला कुठेय?

मुंबई: चांद्यापासून बांद्यापर्यंत अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील अनेक सीन्सने आणि कथेने

Saba Pataudi: सैफ अली खानची बहिण 27 व्या वर्षी ब्रेन ट्युमरची शिकार; म्हणाली, ‘चालता- चालता अचानक...’

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा पटौदी हिने अलीकडेच तिच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला

Madhuri Dixit: लोकांच्या टोमण्यांमुळे माधुरी दीक्षितही कधीकाळी खचलेली, आईने शिकवलेल्या संघर्षाच्या धड्यामुळे बदललं आयुष्य!

मुंबई: बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांना नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार

कैकेयी- मंथरेची पहिली झलक; Ramayana चित्रपटातील लारा दत्ता आणि शीबा चढ्ढा यांच्या भूमिकेची चर्चा

मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या पात्रांचे पोस्टर समोर