BMC : अतिक्रमणे हटवलेली नसताना प्रशासनाने केला अतिक्रमणमुक्त रस्त्यांचा दावा

अतिक्रमणांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजीचा प्रस्ताव स्थायी समितीने ठेवला राखून

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने अनधिकृत बांधकामे हटवल्याने पी दक्षिण आणि पी पूर्व विभागातील २३ रस्त्यांच्याी डागडुजी करण्याचे काम हाती घेवून त्यावर साडेसहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामेच हटवली नाहीत तरीही काही ररस्त्यांचा समावेश या प्रस्तावात असल्यामुळे प्रशासनाच्या हातचलाखीचा प्रस्ताव सदस्यांच्या आक्षेपानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी राखून ठेवला.


याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या प्रिती सातम यांनी या प्रस्तावामध्ये २३ रस्त्याचा समावेश आहे. त्यातील मोहन गोखले मार्ग आणि अमृत वन हे दोन रस्ते आपल्या प्रभागातील आहेत. परंतु यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही तर मग हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याचे कसे सांगितले जात आहे. मग त्या भागाची डागडुजी करणार तरी कशी असा सवाल केला. तसेच गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यावरील अतिक्रमण हटल्यानंतर त्या भागाची डागडुजी आधीच झाली आहे. त्यामुळे मोहन गोखले मार्ग आणि अमृतवनवरील अतिक्रमण कुठले हटवले याची माहिती देण्यात यावी आणि याची चौकश करावी अशी मागणी केली. यावर तेजिंदर तिवाना यांनी यातील २३ रस्त्याच्या लांबी व रुंदीची माहितीच देण्यात आली नसल्याचे सांगत इतर वॉर्डामध्ये कधी अशाप्रकारची डागडुजी होणार आहे असा सवाल केला.


मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी यासाठीचा अंदाजित खर्च ८.१८ कोटी रुपये कशाच्या आधारे बनवण्यात आला आहे याची विचारणा करत यासाठी उणे ३८ टक्के दर कसा आला मग असा सवाल केला. तर यशोधर फणसे यांनी परिमंडळ ४मध्येच के पश्चिम विभाग येत असून येथील एस.व्ही.रोडवरील अतिक्रमण हटल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून आम्ही याची डागडुजी करण्याची मागणी करत आहोत. या रस्त्याचा समावेश नाही. परंतु सातम यांच्या प्रभागातील अतिक्रमण न हटवलेल्या दोन रस्त्यांचा समावेश केलेला आहे. तर जमीर कुरेशी यांनी यासाठी नियुक्त राजाराम कंपनीबाबत काही आक्षेप असल्याचे दाखले दिले. तर किती उणे दराने निविदा आली तर आपण स्वीकारायची याबाबत तत्कालिन अजोय मेहता यांनी जारी केलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार का असा सवाल केला तर डॉ सईदा खान अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर त्या मोकळ्या जागांवर अनधिकृत पार्किंग होते यावर महापालिकेचे नियंत्रण कसे आहे असा सवाल केला.


यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत नाही तोवर हा प्रस्ताव राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या दादर हॉकर्स प्लाझामध्ये अनधिकृत बांधकाम, चक्क जिन्याखाली उभारले पक्के गाळे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) फेरीवाल्यांचे कायम आणि सुरक्षितपणे पुनर्वसन करता यावे म्हणून दादरला हॉकर्स

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांसह आरोग्य सुविधा पीपीपी मॉडेलवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी

BMC : मुंबईतील झोपड्यांच्या १४ फुटांवरील कारवाई होणारच, पण तक्रारनिहाय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपड्यांच्या १४ फुटांवरील बांधकामांवरील कारवाईची घोषणा महापालिकेच्यावतीने

मुंबईतील एसआरए प्रकल्पांचे होणार 'ऑडिट', माजी खासदार राहुल शेवाळे यांचा समितीमध्ये समावेश

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि त्यांमधील कायदेशीर पेच

Saba Pataudi: सैफ अली खानची बहिण 27 व्या वर्षी ब्रेन ट्युमरची शिकार; म्हणाली, ‘चालता- चालता अचानक...’

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा पटौदी हिने अलीकडेच तिच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला

मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण करणार; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : मुंबई शहरातील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती