नवी दिल्ली : देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सीमांवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्करी जवानांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष समारंभात भारतीय लष्करासाठी ‘भारत राईस’ (Bharat Rice) ची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे.
लष्कर आणि अन्न महामंडळामध्ये महत्त्वपूर्ण करार
या भव्य कार्यक्रमादरम्यान भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळ (FCI) यांच्यात युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत पायाभूत सुविधांचा प्रभावीपणे वापर करण्यासंदर्भातील एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या उच्च दर्जाच्या तांदळाचे वितरण स्थानिक सुविधा केंद्रांऐवजी थेट लष्कराच्या पुरवठा आगारांमध्ये (Army Supply Depots) केले जाणार आहे. यामध्ये लडाख आणि ईशान्येकडील (North-East) दुर्गम व अतिसंवैधानिक भागांचाही समावेश आहे.
'जय जवान, जय किसान' भावनेचा प्रत्यय
यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की, भारत राईस हा विश्वासाचा एक मजबूत बंध असून त्याची सुरुवात शेतकऱ्यांच्या शेतात होते आणि तो थेट सैनिकांच्या ताटापर्यंत पोहोचतो. 'जय जवान, जय किसान' या भावनेला या उपक्रमाने प्रत्यक्ष साकार केले असून, शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचे रुपांतर सैनिकांच्या बळात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सैनिकांची युद्धसज्जता केवळ शस्त्रास्त्रांवर नाही, तर त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अवलंबून असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : संविधानाची प्रत हातात घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. निवडणूक आयोग, ...
सैनिकांना दर्जेदार अन्न पुरवणे हे आपले कर्तव्य
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आपले अनन्यसाधारण साहस आणि निष्ठेने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना अत्यंत उच्च प्रतीच्या तांदळाचे वितरण करायला मिळणे ही आपल्या विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांना दर्जेदार अन्न पुरवणे आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.