IND vs WI: फक्त 25 धावा करताच अभिषेक शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, असं करणारा दुसरा भारतीय ठरणार

भारत वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात त्याचा झंझावात पाहायला मिळाला आणि 2000 धावांचा पल्ला गाठला. आता आणखी एक विक्रम अभिषेक शर्माच्या रडारवर आहे.

1/5 वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताने या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता 14 ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चौथा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल.(Photo: ANI)

2/5 वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. अभिषेक शर्मासाठी हैदराबादचं मैदान काही नवीन नाही. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने अनेक विक्रम या मैदानात रचले आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याची बॅट तळपली तर टी20 क्रिकेटमध्ये या मैदानात 1000 धावा करणारा फलंदाज ठरेल. त्याला यासाठी फक्त 25 धावांची गरज आहे. (Photo: ANI)

3/5 टी20 क्रिकेटमध्ये हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये शिखर धवने 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भारताचा एकमेव फलंदा आहे. आता अभिषेक शर्माने चौथ्या टी20 सामन्यात 25 धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. (Photo: ANI)

4/5 हैदराबादच्या या मैदानात मागची आकडेवारी पाहता अभिषेक शर्माला रोखणं सोपं नाही. अभिषेक शर्माने या मैदानात 31 टी20 डाव खेळला आहे. यात त्याने 975 धावा केल्या आहेत. (Photo: ANI)

5/5 हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट हा 211.03 चा आहे. त्याने या मैदानात 2 शतकं आणि सात अर्धशतकं ठोकली आहेत. यासह त्याने 93 चौकार आणि 71 षटकार मारले आहेत. (Photo: ANI)
Comments
Add Comment

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास

Central Railway Block : पनवेल - कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; काही एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावणार

पनवेल येथे सुरू असलेल्या कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर; गरजू रुग्णांना मिळणार नवा आधार

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, या उद्देशाने काम करणाऱ्या मुख्यमंत्री सहायता

Sunday Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मुंबईकरांनो, रविवारी (29 नोव्हेंबर) लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक आधी तपासा.

सहकारी साखर कारखान्यांच्या 'शासकीय कर्ज हमी'ला लगाम; 100 कोटींची मर्यादा

मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनाच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यांना दिल्या