मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये झळकणार!

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॉलिवूड चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आता दोन बड्या बिग-बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत असून या चित्रपटाचं दिग्दर्शन दोन पूर्णपणे वेगळी दृष्टी असलेल्या दिग्दर्शकांनी केले आहे.


तो 'रामायण' मध्ये दंगलफेम दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी भव्य चित्रपटात दिसणार असून एकीकडे 'नयी नवेली' या बालाजी मोहन दिग्दर्शित भव्य स्तरावरील अनोख्या संकल्पनेवर आधारित मनोरंजक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे. या दोन चित्रपटाची खासियत म्हणजे असे दोन दिग्दर्शक जे कायम वैविध्यपूर्ण विषयावर आधारित कलाकृती घडवत आले आहेत. दिग्दर्शकांचा काम करण्याचा दृष्टिकोन हा कायम चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. आदिनाथने देखील या दोघांच्याही अपेक्षा उत्तमरीत्या पूर्ण केल्या आहेत.



आपल्या अनुभवाबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे सांगतो, “बालाजी मोहन आणि नितेश तिवारी या दोन दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करणं हा माझ्यासाठी एका मोठ्या मास्टरक्लाससारखा अनुभव होता. बालाजी सर फँटसी, कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि मोठ्या कलाकारांच्या फळीला अत्यंत शांतपणे आणि सहजतेने एका सूत्रात बांधतात. सेटवरचा त्यांचा संयम थक्क करणारा असतो. तर दुसरीकडे, नितेश सरांचं व्हिजन अथांग आणि भव्य आहे; महाकाय कॅनव्हासवर काम करतानाही ते भावनिक बारकावे आणि अचूक नियोजन कधीही सुटू देत नाहीत. एवढ्या मोठ्या स्केलचा चित्रपट साकारताना स्वतःची दृष्टी पूर्णपणे स्पष्ट ठेवणं आणि कलाकाराला विश्वास देणं, ही या दोन्ही दिग्दर्शकांची सर्वात मोठी ताकद आहे” राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते आता बॉलिवूडमधील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनण्यापर्यंतचा आदिनाथचा प्रवास हे सिद्ध करतो की कायम उत्तम काम करून वेगवेगळ्या उंचीवरचे चित्रपट केले पाहिजे.

Comments
Add Comment

King khan: किंग खानचा चाहत्यांसाठी गुड न्यूज, शारुखच्या वाढदिवशी फॅन्सला मिळणार खास गिफ्ट

मुंबई: शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या

Arijit Singh Mumbai Concert : अरिजीत सिंगच्या मुंबई कॉन्सर्टची महागडी तिकीटं चर्चेत; किंमत ऐकून बसेल धक्का!

मुंबई : आपल्या जादूई आणि सुरांनी कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय गायक अरिजीत सिंग (अरिजित सिंह)

Ranbir kapoor: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मधून उलगडणार जटायूची कथा, पहिली झलक पाहिली का?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या आगामी ‘रामायण’ या सुपरहिट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.

Jailer 2: रिलीजच्या आधीच Jailer 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ‘टॉक्सिक’सह चार चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

टॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रदर्शित होणाऱ्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची सध्या फ्यान्स विश्वात जोरदार

जिद्द, चिकाटी आणि रूढीवादी समजुती मोडून काढणारी एक प्रभावी कथा! सुमो दीदीचा ट्रेलर प्रदर्शित !

भारताची पहिली व्यावसायिक महिला सुमो कुस्तीपटू हेतल दवे यांच्या उल्लेखनीय प्रवासावर आधारित 'सुमो दीदी' या

Vijay-Rashmika at Tirupati : तिरुपती मंदिरात रश्मिका-विजयला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी; 'रणबाली'च्या रिलीजपूर्वी दोघांनी घेतले व्यंकटेश्र्वरांचे दर्शन

तिरुपती : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी मंगळवारी पहाटे