सांताक्रूझ स्कायवॉकला छत बसवण्याचा प्रस्ताव अद्यापही रखडलेला, BMC स्थायी समितीच्या मंजुरीकडे लक्ष

सांताक्रूझ पूर्वेकडील स्टेशन लगत असणाऱ्या स्कायवॉकचं छत बसवण्याच्या कामासाठी गेले अनेक दिवस उलटले आहेत, तरीही अद्याप निविदा प्रलंबितच आहे.

मुंबई: सांताक्रूझ पूर्वेकडील स्टेशन लगत असणाऱ्या स्कायवॉकचं छत बसवण्यासाठी निविदा काढून अनेक महिने उलटले आहेत. इतके महिने उलटले तरीही सुद्धा रहिवासी अजूनही कामाची सुरूवात होण्याची वाट पाहत आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून स्कायवॉकचं काम केलं जात आहे. बीएमसीने दिलेल्या वृत्तानुसार, कामाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. परंतू ह्या प्रकल्पाला अद्यापही बीएमसीच्या स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. 2027 च्या पावसाळ्यापूर्वी कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.



नेहरू रोडलगत असणार्‍या छप्पर नसलेला रस्ता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला वाकोला येथील सेंट अँथनी चर्च जंक्शन स्थानकाशी जोडतो. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कायवॉकवरून जाताना नागरिकांना छप्पर नसल्यामुळे तीव्र ऊन आणि पावसाचा सामना करावा लागतो, त्यामुळे अनेक नागरिक स्कायवॉकवरून न जाता रस्त्यावरून जातात. एका रहिवाशाने 'Mid Day' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "माझी मुख्य शंका ही आहे की, काम करण्यासाठी पुढच्या पावसाळ्यापर्यंत का थांबावं लागेल? पण तरीही, आम्हाला हे काम पूर्ण झालेले हवे आहे. मी या संदर्भात महापालिकेतल्या अनेक अधिकार्‍यांशी संपर्क साधला आहे. नगरसेवकांनी मला सांगितले की, स्थायी समिती सुमारे दोन आठवड्यांत याला मंजुरी देईल, त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात होण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही सातत्याने या कामासाठी पाठ पुरावा करत राहणार आहे."



स्कायवॉकवर अनेक वर्षांपासून छप्पर नाही आणि पुरेशी लाईट्स नाही. पादचारी मार्गावरील या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी रहिवाशांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधला. नागरिकांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे महानगर पालिकेने रस्त्यावर पथदिवे लावले. मात्र, अद्यापही छताचे काम प्रलंबित असल्याने, नागरिकांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण मिळत नाही. प्रत्येक ऋतूमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्यामुळे नागरिकांकडून या मागणीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पादचाऱ्यांना उघड्या स्कायवॉकचा वापर करणे किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाकोला जंक्शनपर्यंत नेहरू रोडवरून चालणे, या दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागतो .


बीएमसीच्या पूल विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने 'Mid Day'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “छताचा आणि इतर सर्व गोष्टींचा आराखडा आधीच तयार आहे. सध्या आम्ही स्थायी समितीच्या मंजुरीची वाट पाहत आहोत. सर्व कागदपत्रे आणि इतर आवश्यक कामे सुमारे 15 दिवसांपासून ते एका महिन्याच्या आत पूर्ण होतील, त्यानंतर 2027 च्या पावसाळ्यापर्यंत कामाला सुरुवात होईल.”

Comments
Add Comment

कचऱ्यापासून 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस' निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीला चालना

शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावल्यास कारवाई, मायक्रो फायनान्स कंपन्यांना महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा

मुंबई: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि अवैध सावकारांविरोधात

Malad Accident : मुंबईत भीषण अपघात : मालाडमध्ये रिक्षा आणि बाईकच्या धडकेनंतर बसखाली आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम (Malad West) येथील मार्वे रोडवर एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव

Nana Patekar : ‘आठवणीतले नाना’ कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाची आठवण जागवण्यासाठी मुंबईत ‘आठवणीतले नाना’ या विशेष

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी

Santacruz Chembur Link Road : सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील उड्डाणपुलांच्या दुरुस्ती खर्चात १६ कोटींनी वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पूर्व उपनगरातील सांताकुडा चेंबूर लिंक रोड आणि स्वामीनारायण उड्‌डाणपुलाच्या