Santacruz Chembur Link Road : सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील उड्डाणपुलांच्या दुरुस्ती खर्चात १६ कोटींनी वाढ

दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर दोन वर्षांत दिसून आले विविध,ठिकाणी बांधकामात बिघाड

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


पूर्व उपनगरातील सांताकुडा चेंबूर लिंक रोड आणि स्वामीनारायण उड्‌डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल १६ कोटींनी वाढला आहे. या पुलाच्या अंदाजपत्रके तयार केल्यापासून दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर पुलाच्या विविध घटकांमधील बिघाडांचे स्वरूप आणि प्रमाण हळूहळू वाढत गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या वाढलेल्या बिघाडांमुळे आवश्यक दुरुस्ती व पुनर्वसन कामांचे प्रमाण वाढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.


या पुलांच्या बांधकामाचा मूळ कंत्राट किंमत विविध करांसह ३१.७६ कोटी रुपये एवढी होती आणि. यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरील स्वामीनारायण उड्‌डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे या कंत्राटदाराने पूर्ण केली आहे. कंत्राटदाराद्वारे पूर्ण करण्यात आलेली आहेत. मे २०२३ दरम्यान ०३ उड्‌डाणपूलांचे तपासणी अहवाल आणि अंदाजपत्रके तयार करून पूल विभागाच्यावतीने या उड़्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. परंतु जुलै २०२५ रोजी आयआटीचे प्राध्यापक सौविक बॅनजी यांनी एससीएलआरवरील उड्डाणपूलाच्या स्ट्रक्चरलची फेर तपासणी केली असता दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर पुलाच्या विविध घटकांमधील संरचनात्मक बिघाडांचे स्वरूप आणि प्रमाण हळूहळू वाढत गेल्याचे जुलै २०२५ मध्ये केलेल्या संरचनात्मक तपासणी अंती आढळून आले आहे. या वाढलेल्या बिघाडांमुळे आवश्यक दुरुस्ती व पुनर्वसन कामांच्या व्याप्ती आणि प्रमाणात वाढ झालेली आहे.



त्यामुळे पुलाचे आयुष्यमान वाढवण्यासाठी संरचनात्मक दुरुस्तीचे उपाय सुचविले आहेत. त्याबाबतची पडताळणी आय. आय. टी. बॉम्बे यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. या वाढीव कामामुळे मूळ कंत्राट किमतीमधे बदल झाला आहे. हा खर्च विविध करांसह १६ कोटी रुपयांनी वाढला असून ३१.७६ कोटी रुपयांचे काम १६.२६ कोटी रुपयांनी वाढून आता ४८.०३ कोटींवर जावून पोहोचले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Supply : पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई, महापालिका प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी

Dam Inspection : धरणांच्या बांधकामांचे होणार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुल्यांकन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी व विहार या धरणांसाठी सर्वकष

BMC Mumbai : घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनासाठीच्या महानगरपालिकेच्या कामाबाबत पर्यावरण मंत्री समाधानी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अभिनव

सणासुदीत भेसळखोरांवर FDA चा बडगा! अनेक आस्थापनांवर कारवाई

मुंबई : सणासुदीच्या कालावधीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर चाप बसवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

कसारा येथे 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान रेल्वे सेवांवर परिणाम

मुंबई : आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईनच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य

सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाणे नंबर 1, कल्याण, दादर, पनवेल आणि मुंबई CSMTचा कितवा क्रमांक?

मुंबई: कायमच गजबजलेल्या आणि सर्वाधिक व्यस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेकडून 'सर्वाधिक वर्दळीच्या