
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती सादर करण्यास माननीय भारत निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता पात्र नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ( Election Commission News)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पे अँड युज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सेवा लवकरच महाग होणार आहे. मुंबई महापालिकेने सध्या मोफत असलेल्या ...
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ च्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. (Draft Voter List 2026)
दरम्यान, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदार नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे तसेच प्रारूप मतदार यादीतील नोंदींबाबत हरकती नोंदवण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत होणार आहे. त्यामुळे, पात्र नागरिकांनी आणि नवमतदारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक अर्ज व दावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आहे.






