Wednesday, October 14, 2026

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

डॉ. कोय्याला रूथ जॉन पॉल या जगासाठी एक उदाहरण बनल्या असून त्यां मुलींनसाठी तृतीयपंथांसाठी एक प्रेरणा बनल्या

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि कुटुंबाकडून न स्वीकारणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. काही व्यक्तींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा नोकरी मिळवताना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. पूर्वी अनेक तृतीयपंथी व्यक्तींना रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही व्यक्ती शुभप्रसंगी पैसे मागून उदरनिर्वाह करत होते, मात्र, काळानुसार परिस्थितीत बदल घडला. शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि कायदेशीर अधिकारांविषयी वाढलेलया जाणीवेमुळे तृतीयपंथ समुदायातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. काही व्यक्ती डॉक्टर, अधिकारी, उद्योजक, कलाकार आणि राजकीय प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. डॉ. कोय्याला रूथ जॉन पॉल या जगासाठी एक उदाहरण बनल्या असून त्यां मुलींनसाठी तृतीयपंथांसाठी एक प्रेरणा बनल्या आहेत.(Dr. Koyyala Ruth John Paul)
 

कोण आहेत डॉ. कोय्याला रूथ जॉन पॉल?

डॉ. कोय्याला रूथ जॉन पॉल या तेलंगणातील खम्मम जिल्ह्याचा रहिवासी आहेत. त्या तृतीयपंथी महिला असून, अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ऑक्टोबर 2026 मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी हैदराबादमधील ESIC मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधून इमर्जन्सी मेडिसिन या विषयात एमडी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. भारतात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पहिल्या उघडपणे ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
 

डॉक्टर होण्याचा प्रवास

डॉ. रूथ यांनी 2018 मध्ये एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. मात्र, वैद्यकीय पदवी मिळवलयानंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना नोकरी मिळवताना भेदभावाचा सामना करावा लागला. 2022 मध्ये त्यांची आणि डॉ. प्राची राठोड यांची हैदराबादमधील उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्त्या तेलंगणातील तृतीयपंथी समुदायासाठी खूप महत्वाचा ठरल्या.    

पदव्युत्तर शिक्षणासाठी लढा

एमबीबीएसनंतर त्यांना वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवायचे होते. त्यासाठी त्यांनी NEET-PG परीक्षा दिली. मात्र, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत तृतीयपंथ उमेदवारांच्या नोंदणी आणि आरक्षणाबाबत स्पष्ट नियम नसलयाने त्यांना अडचणी आल्या. त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली. न्यायालयाच्या शेवटचा आदेशानंतर 2023 मध्ये त्यांना हैदराबादमधील ESIC मेडिकल कॉलेजमध्ये इमर्जन्सी मेडिसिन या विषयात एमडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू केले.(MBBS)
 

2026 मध्ये शिक्षणात यश

डॉ. रूथ यांनी एमडी आणि एमएस परीक्षेतील सर्व विषय उत्तीर्ण करून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय शिक्षणात समान संधी, ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अधिकार आणि सामाजिक भेदभाव यांसारखे मुद्दे पुन्हा चर्चेत आले असून आता तृतीयपंथांचा हक्कांचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >