
बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. बदलापूरच्या स्केल ऍन्ड टेल्स कंजर्वेशन संस्थेचे सभासद तथा प्रतिभावान वन्यजीव छायाचित्रकार सिताराम दिनकर राऊळ यांना लंडन येथील प्रतिष्ठित नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या जगप्रसिद्ध ‘Wildlife Photographer of the Year’ (WPY) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘Category Winner’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना हा बहुमान ‘Invertebrate Behaviour’ या श्रेणीत मिळाला असून, जगभरातून प्राप्त झालेल्या ६५,आउटहून (६५,००० हून) अधिक छायाचित्रांमधून त्यांच्या कलाकृतीची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वन्यजीव छायाचित्रणाच्या विश्वात या स्पर्धेला ‘ऑस्कर’ म्हणून ओळखले जाते.
वाळवंटातील विंचवाच्या जीवनातील दुर्मीळ क्षणाचे विलोभनीय चित्रण
सिताराम राऊळ यांच्या पुरस्कारप्राप्त छायाचित्रात वाळवंटातील एक बिळ करणारा विंचू स्वतःसाठी वाळूत खड्डा खोदून निवारा तयार करत असल्याचा अत्यंत दुर्मीळ क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. वाळवंटासारख्या अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक वातावरणात जीवसृष्टी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कसे अनुकूलन करते, याचे विडंबन यातून होते. सामान्यतः वन्यजीव छायाचित्र म्हटले की मोठे प्राणी डोळ्यांसमोर येतात, मात्र राऊळ यांनी आकाराने अत्यंत लहान असलेल्या जीवांच्या जगण्याच्या संघर्षाकडे जगाचे लक्ष वेधले आहे.
चौदा वर्षांचा खडतर छायाचित्रणाचा प्रवास
गेल्या सुमारे १४ वर्षांपासून छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिताराम राऊळ यांना मॅक्रो आणि क्रिएटिव्ह नेचर फोटोग्राफीची विशेष आवड आहे. व्यावसायिक अनुभवासोबतच ते मागील काही वर्षांपासून चित्रकलेचाही अभ्यास करत आहेत. चित्रकलेतील रचना, रंग, प्रकाश आणि भावनांची अभिव्यक्ती हे सर्व घटक ते आपल्या छायाचित्रणात अत्यंत कल्पकतेने वापरतात. त्यांच्या या दैदीप्यमान यशामागे त्यांचे कुटुंब, छायाचित्रकार मित्र आणि चित्रकलेचे गुरु सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.
मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘महागणेशोत्सव : महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ अंतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ...
निसर्गसंवर्धनासाठी छायाचित्रणाचा प्रभावी वापर
या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे वाळवंटातील विंचवासारख्या दुर्लक्षित जीवांकडे आणि त्यांच्या अधिवासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. निसर्गातील प्रत्येक छोट्या-मोठ्या जीवाला पर्यावरणीय व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असते, हे त्यांच्या छायाचित्रणातून अधोरेखित होते. आपल्या कलाकृतीमधून निसर्गातील दुर्लक्षित पैलू जगासमोर आणण्याचे आणि लोकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याचे आपले व्रत पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सिताराम राऊळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या जागतिक यशाबद्दल बदलापूर आणि देशभरातील कलाविश्व व निसर्गप्रेमींकडून त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे.





