BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबईकरांची पाणी समस्या दूर करण्यासाठी शहरातील टँकरची फेऱ्या आता अधिक वाढल्या जाणार आहेत.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कमी दाबाने पुरवठा होणाऱ्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवले जाणार आहे. सध्या महापालिकेच्यावतीने ३७ टँकरची सेवा घेतली जात असून येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत आणखी २२ टँकर सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी येत्या दिवसांमध्ये एकूण ५९ टँकरची सेवा उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांची पाणी समस्या दूर करण्यासाठी शहरातील टँकरची फेऱ्या आता अधिक वाढल्या जाणार आहेत.



मुंबईत १५ मे २०२६ रोजी दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यानंतर २६ प्रभागांमध्ये तातडीने ८ तासांच्या पाळीमध्ये १० हजार लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याची योग्य वाहतूक करण्यासाठी टँकरची व्यवस्था खासगी चालक व मालकांच्यावतीने भाडेतत्वावर घेण्यात आली होती. यासाठी ६७ लाख १० हजार रुपयांचा खर्च झाला असून याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता उबाठाचे यशोधर फणसे यांनी टँकरची सेवा खासगी गृहनिर्माण संस्थेला देण्यात आल्यानंतर एकाच पत्राच्या आधारे दोन ते तीन टँकर भरुन विकले जाते. आपलेच पाणी आपल्या विकले जाते. यामध्ये प्रत्येक टँकरच्या फेऱ्यांची संख्या आणि दर दिलेला नसल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तर टँकर मालकांबाबत तक्रारी आल्यानंतर आपण त्यांच्याकडून ही सेवा घेतली का असा सवाल यामिनी जाधव यांनी व्यक्त केला. तर जमीर कुरेशी यांनी १० हजार टँकरमधून ०५ हजार लिटर पाणी आणून विकले जाते. मग इतर वापरासाठी आपण एसटीपीचे पाणी का वापरत नाही असा सवाल केला. तर तेजिंदर सिंग तिवाना यांनी जलअभियंता विभागाच्यावतीने या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकरची सेवा घेणे आवश्यक आहे. मग याठिकाणी मलनि:सारण प्रचालन विभागाच्यावतीने टँकरची सेवा का घेतली जाते असा सवाल करत महापालिकेच्या जलभरणा केंद्रावर आतापर्यंत किती टँकर पाणी भरले गेले याची माहिती देण्याची सूचना केली.


तर महापालिकेच्या जलभरणा केंद्रांवर पाणी भरणाऱ्या प्रत्येक टँकरसाठी ओटीपी क्रमांक बंधनकारक करण्यात येणार होती, याची अंमलबाजवणी झाली का? जर झाली नसेल तर या पाण्याच्या नावाखाली लूटमार होईल अशी भीती प्रिती सातम यांनी व्यक्त केली. सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रिती सातम यांच्या सूचनेचे समर्थन करत उद्यान आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या वापरासाठी जलवाहिनीची जोडणी खंडित करून त्याठिकाणी विहिर आणि बोअरवेलचे पाणी वापरणे बंधनकारक करण्यात यावे अशी सूचना केली. मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी विहिरींची स्वच्छता केल्यानंतर ते पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केला होता, त्याचे काय झाले असा सवाल केला. यावेळी झालेल्या चर्चेत शीतल गंभीर, प्रकाश दरेकर, श्रध्दा जाधव, डॉ सईदा खान, मिनाक्षी पाटणकर यांनी भाग घेतला होता.


यावेळी प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अविनाशा ढाकणे यांनी मुंबई महापालिकेच्यावतीने कपात लागू केल्यानंतर पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची सेवा घेण्यात आली होती. २६ प्रशासकीय कार्यालयांच्या हद्दीत ही सेवा घेतली जाणार होती, परंतु ए आणि ई प्रभागातच याचा प्रतिसाद लाभला. इतर प्रभागांमध्ये प्रतिसाद न लाभल्याने तिथे या टँकरची सेवा भाडेतत्वावर घेण्यात आली नव्हती. यामध्ये ४३२१ रुपये दराने टँकरची सेवा घेण्यात आली होती. सध्या महापालिकेचे ३७ टँकर असून डिसेंबर २०२६ पर्यंत आणखी २२ नवीन टँकर दाखल होणार आहे. तसेच ओटीपी नोटीफिकेशनची प्रक्रिया सुरु असून जीपीएस तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात

BMC Commissioner Inspection : महापालिका आयुक्तांनी घेतला वरळीसह सांताक्रुझ, विलेपार्ले परिसराची केली पाहणी

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खाली साचणारा कचराही नियमितपणे स्वच्छ

Kalyan Junction : कल्याण रेल्वे स्थानकात ‘स्टेशन महोत्सव’; भारतीय रेल्वेचा समृद्ध वारसा उलगडला

मुंबई : भारतीय रेल्वेचा समृद्ध इतिहास, ऐतिहासिक महत्त्व आणि गौरवशाली परंपरा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक, समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मुंबई: मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उपसमितीचे