BMC Commissioner Inspection : महापालिका आयुक्तांनी घेतला वरळीसह सांताक्रुझ, विलेपार्ले परिसराची केली पाहणी

पदपथ अतिक्रमण मुक्त करतानाच गाडी खाली कचरा, लोंबकळणाऱ्या हटवण्याचे दिले निर्देश

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खाली साचणारा कचराही नियमितपणे स्वच्छ करा...स्काय वॉकवरून खाली लोंबकळणाऱ्या केबल्स काढून टाका...विलेपार्ले स्थानक परिसरातील पदपथ रुंद करा...सांताक्रुझ (पश्चिम) मधील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने काढा,असे निर्देश देत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनीपदपथ धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘पादचारी प्रथम’अभियानाची तसेच कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बुधवारी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी पदपथांची स्थिती, अतिक्रमणे, रस्त्यांची स्वच्छता, सुविधांयुक्त प्रसाधनगृह, कचरा संकलन व्यवस्था तसेच आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. पादचाऱ्यांना अडथळ्यांविना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.



या पाहणी दौऱ्यात जी दक्षिण विभागातील सेनापती बापट मार्गावरील जी. एल. लोडर चौकी, वरळी येथील आदर्शनगर मार्ग, एच पश्चिम विभागातील सांताक्रुझ परिसरातील टिळक मार्ग व महात्मा गांधी मार्ग, एच पूर्व विभागातील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, के दक्षिण विभागातील विले पार्ले स्थानक मार्ग तसेच डॉ. व्ही. एन. शिरोडकर प्रसूतिगृह या ठिकाणांचा समावेश होता.
या पाहणी दौऱयावेळी उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (जी दक्षिण विभाग) श्रीमती स्वप्नजा क्षिरसागर, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) मृदुला अंडे आणि सहायक आयुक्त (के दक्षिण विभाग) वनिता कोकाटे आदी उपस्थित होते.



कचरा संकलन वाहनांच्या आच्छादनाची पाहणी


जी दक्षिण विभागातील सेनापती बापट मार्गावरील जी. एल. लोडर चौकी येथे आयुक्त आश्विनी भिडे यांनी कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या वाहनांची पाहणी केली. या वाहनांवर कचरा वाहतुकीदरम्यान आच्छादन कशा पद्धतीने केले जाते, याची त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. तसेच रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रश आदी उपकरणांचीही माहिती जाणून घेतली.



पदपथांची स्थिती सुधारण्याचे निर्देश



वरळी येथील आदर्शनगर मार्गावरील पदपथांची स्थिती आणि दुरुस्तीच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली. नागरिकांना पदपथांवरून सहज आणि सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खाली साचणारा कचराही नियमितपणे स्वच्छ करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.



अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्याच्या सूचना



एच पश्चिम विभागातील सांताक्रुझ परिसरातील टिळक मार्ग आणि महात्मा गांधी मार्गावरील पदपथांची आयुक्त भिडे यांनी पाहणी केली. या मार्गांवरील अतिक्रमणे हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्काय वॉकवरून खाली लोंबकळणाऱ्या केबल्स काढून टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करावी, तसेच रस्त्याच्या दुभाजकांची नियमित स्वच्छता राखून ते स्वच्छ व सुस्थितीत ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले.



पदपथ रुंद करण्याच्या सूचना



एच पूर्व विभागातील पंडित नेहरू मार्गावरील वाकोला जंक्शन ते सांताक्रुझ रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता ३६.६० मीटर (१२० फूट) रुंदीच्या मंजूर रेषेनुसार विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता रुंदीकरणासाठी लगतच्या मालमत्तांची खुली मोकळी जागा संपादित करण्याच्या दृष्टीने एच पूर्व विभाग कार्यालयामार्फत २८ नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, रेल्वे स्थानक परिसरातील ८९ परवानाधारक गाळे जवळच्या परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. याशिवाय, एच पूर्व विभागामार्फत २१ अनधिकृत गाळे तोडण्यात आले आहेत.


तसेच एच पश्चिम विभागातील कान्हुबाई देसाई मार्गावरील अधिकृत ८६ गाळे, सांताक्रुझ परिसरातील महात्मा गांधी मार्गावरील ८२ गाळे, ५० भाजीपाला विक्रेत्यांच्या गाळे, यासह लोकमान्य टिकळ मार्गावरील १४ गाळे लवकरात लवकर स्थलांतरीत करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त भिडे यांनी दिले.



डॉ. व्ही. एन. शिरोडकर प्रसूतिगृहातील आरोग्य सुविधांचा आढावा



दौऱयादरम्यान महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी के दक्षिण विभागातील डॉ. व्ही. एन. शिरोडकर प्रसूतिगृहाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. प्रसूतीसाठी येणाऱया महिलांसाठी उपलब्ध असलेला औषधसाठा आणि इतर सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला. प्रसूतिगृहात लवकरच कार्यान्वित करण्यात येणाऱया नवजात शिशू अतिदक्षता विभागाचीही त्यांनी पाहणी केली. रुग्णांच्या उपचारांशी संबंधित माहिती तसेच औषधसाठ्याची नोंद व व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारी संगणकीय प्रणाली कशा प्रकारे कार्य करते, याची माहिती आयुक्तांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱयांकडून जाणून घेतली.

Comments
Add Comment

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात

Kalyan Junction : कल्याण रेल्वे स्थानकात ‘स्टेशन महोत्सव’; भारतीय रेल्वेचा समृद्ध वारसा उलगडला

मुंबई : भारतीय रेल्वेचा समृद्ध इतिहास, ऐतिहासिक महत्त्व आणि गौरवशाली परंपरा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी

Maratha Reservation: मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक, समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मुंबई: मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उपसमितीचे