AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योग प्रभावी कामगिरी करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडियाच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राची क्षमता आणि जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले.

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी करत आहेत. यावरून भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक दर्जाची क्षमता स्पष्ट होते. देशात बल्क ड्रग पार्क विकसित करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असून, हे पार्क कार्यान्वित झाल्यानंतर औषधनिर्मिती क्षेत्रात मोठे परिवर्तन घडेल. औषधनिर्मिती, वैद्यकीय सेवा आणि मेडटेक क्षेत्रात नावीन्यामुळे मोठे बदल होत आहेत. आरोग्यसेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन आवश्यक आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडियाच्या नवीन मुख्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यापूर्वी कर्नाटकातील बंगळुरू येथे कंपनीचे मुख्यालय होते. या कार्यक्रमाला आमदार अतुल भातखळकर, ॲस्ट्राझेनेकाचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ॲस्ट्राझेनेका इंडियाचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली व इतर मान्यवर उपस्थित होते. ॲस्ट्राझेनेकाचे अत्याधुनिक मुख्यालय मुंबईत सुरू झाल्यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन, नावीन्य आणि जागतिक सहकार्याला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड महामारीच्या काळात भारताने ‘कोविड मैत्री’ उपक्रमातून ९९ देशांना लसींचा पुरवठा करून ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना जगासमोर मांडली. या प्रयत्नांमध्ये ॲस्ट्राझेनेकाचे योगदानही मोलाचे आहे. महाराष्ट्र सरकार उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. उद्योगांची वाढ होते तेंव्हा राज्याचीही प्रगती होते, या भूमिकेतून महाराष्ट्र सरकार व्यवसायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन आणि नवोन्मेषासाठी महाराष्ट्रात अनुकुल वातावरण असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यादरम्यान स्वित्झर्लंडच्या आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्यसेवेतील प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. नावीन्यपूर्ण संशोधनातून अचूक निदान, प्रभावी उपचार आणि उत्तम औषधे उपलब्ध होऊन नागरिकांचे आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत होईल. ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील मुख्यालयामुळे नवीन औषधांचे संशोधन आणि उत्पादन यांना चालना मिळेल. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांशी कंपनीने भागीदारी करावी. यामुळे संशोधनाला गती मिळेल आणि तरुण संशोधकांच्या प्रतिभेचा उपयोग करून नावीन्याला प्रोत्साहन देता येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू अत्यंत दुर्मीळ करण्याच्या दिशेने ॲस्ट्राझेनेकाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. सर्वांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळायला हव्यात. आणि नाविन्यपुर्ण संशोधनातूनच हे शक्य आहे. त्यातूनच अचूक निदान आणि परिणामकारक उपचार , उत्तम-दर्जेदार औषधांच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावणे शक्य असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची

Dussehra 2026 : यंदा विजयादशमी २० की २१ ऑक्टोबरला ? जाणून घ्या रावण दहनाची योग्य वेळ आणि पूजेचे मुहूर्त!

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत पवित्र, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे 'दसरा' किंवा