Friday, October 16, 2026

Rajgira Kheer : नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतोय ? दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ट्राय करा ही चवदार राजगिरा खीर.

  1/4 राजगिरा, दूध, बदाम आणि ड्रायफ्रूट्सचा हा परफेक्ट संगम तुमच्या उपवासाचा उत्साह नक्कीच दुप्पट करेल. राजगिरा स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा, ज्यामुळे खीर छान मऊ आणि दाणेदार बनेल. 2/4 भिजवलेले बदाम थोडे दूध घालून बारीक वाटून घ्या. या पेस्टमुळे खिरीला अप्रतिम घट्टपणा आणि क्रीमी टेक्सचर येते. जाड बुडाच्या कढईत दूध उकळायला ठेवा आणि उकळी आल्यावर त्यात बदामाची पेस्ट व्यवस्थित मिसळा. 3/4 भिजवलेला राजगिरा पाण्यातून काढून उकळत्या दुधात टाका, सोबत बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्सही शिजायला घाला. १५ ते २० मिनिटे मंद आचेवर खीर सतत हलवत राहा, जेणेकरून राजगिरा पूर्णपणे मऊ शिजेल आणि खीर घट्ट होईल. 4/4 खीर शिजल्यावर त्यात आरोग्यासाठी उत्तम असलेली मिश्री (किंवा खांड) आणि वेलची पूड घालून मस्त सुवास आणा. खीर शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि तिला रूम टेंपरेचरवर किंवा हलकी थंड होऊ द्या. खिरीवर ताजी फळे आणि उरलेले ड्रायफ्रूट्स सजवून ही सुपरहेल्दी उपवास स्पेशल खीर सर्व्ह करा!
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >