वेस्ट इंडिजकडे इतिहास रचण्याची संधी
वेस्ट इंडिजकडे भारताचा सात वर्षांपासून सुरू असलेला विजयरथ रोखण्याची संधी आहे. कारण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना आपला इंगा दाखवला आहे. त्यामुळे सामना पालटण्याची ताकद आहे. वेस्ट इंडिजकडे सलग दुसऱ्यांदा भारताला टी20 मालिकेत पराभूत करण्याची संधी आहे. दोन्ही संघ 2023 मध्ये कॅरेबियन बेटावर भिडले होते. तेव्हा वेस्ट इंडिजने भारताला 3-2 ने पराभूत केलं होतं. आता वेस्ट इंडिजकडे भारताचा 7 वर्षांची विजयी घोडदौड रोखण्याची संधी आहे.
[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेपासून स्मृती मंधाना टीम इंडियाची ...
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारताची अग्निपरीक्षा
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या चार टी20 सामन्यात भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. कारण नाणेफेकीचा कौल जिंकूनही वेस्ट इंडिज संघाने चौथ्या सामन्यात आपला वरचष्मा दाखवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात 247 धावा ठोकल्या होत्या आणि विजयासाठछी 247 धावा दिल्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताने हा सामना 24 धावांनी गमावला. वेस्ट इंडिजच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर त्यांनी पॉवर हिटिंगने भारतीय गोलंदाजांवर प्रहार केला. आता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कारण या स्टेडियमची बाउंड्री छोटी आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या पॉवर हिटिंगचा सामना भारतीय गोलंदाजांना कठीण जाऊ शकते.