चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारताची स्थिती
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारताने आतापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. अशा स्थितीत या मैदानावर भारतीय संघाला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला रणनिती बदल करणं अपेक्षित आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीला पाचव्या टी20 सामन्यात संघात स्थान मिळावं यासाठी दबाव वाढत आहे. तर गोलंदाजीचा ढासळता दर्जा पाहता यात प्रामुख्याने बदल करण्याची मागणी होत आहे. चला जाणून घेऊयात रणनितीत कोणते तीन बदल अपेक्षित आहेत ते...
भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन सामन्यांची टी20 मालिकेला 16 ऑक्टोबर 2026 ...
रणनितीत तीन बदल अपेक्षित
- कुलदीप यादव सुरूवातीच्या दोन टी20 सामन्यात खेळला होता. पण तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यात त्याला डावललं गेलं. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यात बंगळुरूच्या खेळपट्टीवर फिरकी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
- बंगळुरूची मैदान थोडं छोटं आहे. त्यामुळे चौकार आणि षटकार मारणं फलंदाजांना सोपं जातं. अशा स्थितीत या मैदानात धावांचा पाऊस पडेल यात काही शंका नाही. भारताची आक्रमक सुरूवात होते. पण मधल्या फळीत कमकुवत बाजू दिसून आली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपेक्षित बदल करणं गरजेचं आहे.
- भारताच्या वेगवान गोलंदाजांना नवी रणनिती अवलंबवावी लागणार आहे. कारण चिन्नास्वामी मैदानातील खेळपट्टीवर जोरात चेंडू आदळणाऱ्या वेगवान गोलंदाजांना लाभ मिळू शकतो. इतकंच काय वेगात थोडेफार बदल करणं अपेक्षित आहे. त्यामुळे फलंदाजाला आक्रमक फटकेबाजी करताना कठीण जाईल.