
या प्रकरणात जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील जुगराज यादव याला 7 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी संतोष मिश्रा यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली.
[caption id="attachment_1066824" align="aligncenter" width="850"] टेस्लाची हवेत उडणारी 'रोडस्टर 2' कार आणि तिची टेक्नॉलॉजी सध्या जगभरात चर्चेत आली आहे.[/caption] [caption id="attachment_1066825" ...
या हत्येमागील नेमके कारण काय होते, तसेच या गुन्ह्यात प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. तपासातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
रासायनिक नमुना घेताना कामगार गंभीर भाजला; उपचारादरम्यान मृत्यू, दोघांविरोधात गुन्हा
पनवेलमधील कासळखंड येथील अस्थी सीएफएस परिसरात रासायनिक पदार्थाचा नमुना घेताना गंभीररीत्या भाजलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भगवत गर्कळ (51) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लिटमस ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड येथे नाकारलेल्या कंटेनरमधील ‘सॅच्युरेटेड अॅसायक्लिक मोनोकार्बोक्झिलिक अॅसिड’ या रासायनिक पदार्थाचा नमुना घेण्याचे काम सुरू होते. यावेळी व्यावसायिक अधिकारी प्रणय रहाटे आणि कस्टम हाऊस एजंट रवींद्र नान्हे यांनी गर्कळ यांना नमुना घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
नमुना घेताना आवश्यक सुरक्षाव्यवस्था आणि संरक्षणात्मक उपायांची खात्री करण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप दोन्ही अधिकाऱ्यांवर आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रणय रहाटे आणि रवींद्र नान्हे यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






