सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

GIFT IFSC मधील सायबर सुरक्षा आणि सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (NISM) दोन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या (जीआयएफटी आयएफएससी) परिसंस्थेत सायबर सुरक्षेच्या क्षमता अधिक सक्षम करणे, संभाव्य धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आव्हानांचा सामना करण्याची तयारी वाढवणे या उद्देशाने दोन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. एनआयएसएमचे संचालक शशी कृष्णन आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटीचे (आयएफएससीए) अध्यक्ष के. राजारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यासक्रमांचे दिमाखदार उद्घाटन झाले असून, या निर्णयामुळे वित्तीय क्षेत्रातील डिजिटल सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.



अभ्यासक्रमांचे स्वरूप आणि दोन प्रमुख टप्पे


नवीन उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षेच्या गरजेनुसार अभ्यासक्रमांचे दोन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये एनआयएसएम-आयएफएससीए-०२ए हा मूलभूत प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून, तो 18 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. या माध्यमातून आयएफएससीएचे अधिकारी, नियमनाधीन संस्थांमधील (आरई) कर्मचारी आणि ज्ञान वाढवू इच्छिणाऱ्या इतर व्यक्तींना प्रशिक्षित केले जाईल. यामध्ये बदलते सायबर धोके, डेटा सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्वांटम संगणनामुळे निर्माण होणारी आव्हाने यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे.


दुसरीकडे, एनआयएसएम-आयएफएससीए-02 बी हा प्रगत (अ‍ॅडव्हान्स) प्रमाणपत्र अभ्यासक्रम 30 डिसेंबर 2026 पासून सुरू होईल, जो विशेषतः नियमनाधीन संस्थांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यात मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीआयएसओ), प्रिन्सिपल ऑफिसर, नियुक्त अधिकारी आणि अनुपालन अधिकारी यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात जोखीम व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, नियामक आवश्यकता समजून घेणे आणि प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित उदाहरणांच्या आधारे निर्णयक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.



परीक्षा शुल्क, रचना आणि नोंदणी प्रक्रिया


दोन्ही अभ्यासक्रमांसाठी परीक्षा शुल्क, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि प्रमाणपत्रांची वैधता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. मूलभूत परीक्षेसाठी 1,180 रुपये शुल्क असून, 50 गुणांच्या या परीक्षेत 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे आणि चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. या प्रमाणपत्राची वैधता दोन वर्षांची असेल. तर प्रगत अभ्यासक्रमाचे शुल्क 2,950 रुपये असून, यात बहुपर्यायी आणि केस स्टडी आधारित प्रश्न असतील. उत्तीर्ण होण्यासाठी 60 टक्के गुणांची अट असून चुकीच्या उत्तरांसाठी 25 टक्के गुण वजा केले जातील. या प्रगत प्रमाणपत्राची वैधता तीन वर्षांची असेल. परीक्षेची नोंदणी करण्यासाठी इच्छुकांना एनआयएसएमच्या https://cert.nism.ac.in/ या अधिकृत प्रमाणपत्र पोर्टलवर संपर्क साधता येईल, जिथे नोंदणीनंतर अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध होईल.

Comments
Add Comment

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या