abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

कलिना कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुपारी ४:३० वाजता ‘अराजकता रोको – लोकतंत्र बचाओ!’ (STOP ANARCHY – SAVE DEMOCRACY!) या मुख्य घोषवाक्याखाली भव्य स्वाक्षरी अभियान आणि शांततापूर्ण निदर्शने अत्यंत उत्साहात पार पडली.

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याच्या उदात्त उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (ABVP) आज, शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. कलिना कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुपारी ४:३० वाजता ‘अराजकता रोको – लोकतंत्र बचाओ!’ (STOP ANARCHY – SAVE DEMOCRACY!) या मुख्य घोषवाक्याखाली भव्य स्वाक्षरी अभियान आणि शांततापूर्ण निदर्शने अत्यंत उत्साहात पार पडली.



देशविरोधी प्रवृत्तींचा तीव्र निषेध


सध्याच्या परिस्थितीत देशात काही विघटनकारी प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक अराजकता माज Over करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. या प्रवृत्तींना मिळणारे संभाव्य बाह्य समर्थन ही अत्यंत चिंतेची बाब आहे. भारतविरोधी शक्ती वेगवेगळ्या संघटनांच्या बुरख्याआड लपून देशात अस्थिरता आणि अशांतता पसरवण्याचा डाव आखत आहेत, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हित, लोकशाही मूल्ये आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे काळाची गरज बनली आहे.



संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचे रक्षण


या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, लोकशाही ही केवळ एक राज्यकारभाराची पद्धत नसून ते स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेले आपल्या संविधानाचे हृदय आहे. लोकशाही संस्थांवर सर्वसामान्यांचा विश्वास ठाम राहिला पाहिजे, कायद्याचे राज्य चोखपणे चालले पाहिजे आणि कोणत्याही हिंसक अथवा बेकायदेशीर मार्गांना देशात स्थान मिळता कामा नये. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग आणि सतर्क राहणे गरजेचे आहे, यावर या अभियानात विशेष भर देण्यात आला.



विद्यार्थी आणि नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद


मुंबई विद्यापीठात पार पडलेल्या या अभियानाला विद्यार्थी, युवक आणि जागरूक नागरिकांचा प्रचंड आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. 'भारतात बांगलादेशसारखी अराजकता अजिबात सहन केली जाणार नाही' या भूमिकेला पाठिंबा देत हजारो विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिमेत भाग घेतला. निदर्शनांच्या माध्यमातून लोकशाहीचे रक्षण, संविधानाचा आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा ठाम संदेश सर्वदूर पोहोचवण्यात आला.



युवकांना अभाविपचे आवाहन


कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभरातील तरुण आणि विद्यार्थी वर्गाला एक महत्त्वाचे आवाहन केले. "देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी नेहमी अग्रभागी राहिले पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून आपली भूमिका मांडावी आणि एका सशक्त, शांततापूर्ण तसेच न्याय्य भारताच्या निर्मितीसाठी सदैव कटिबद्ध राहावे," असे आवाहन अभाविपतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी