Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या! मित्रपक्षांना ‘चेकमेट’ देण्याचे डावपेच

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले आहेत. अमरावतीतील भाजपच्या बंडखोरीचे पडसाद पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटत असून, मित्रपक्षांना कोंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्यांबरोबरच महायुतीतील घटकपक्षांनाही एकमेकांच्या राजकीय खेळींचा सामना करावा लागत आहे.


अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपचे बंडखोर दिलीप कडू यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. या बंडखोरीमुळे शिवसेनेची अडचण वाढली असून, ती शमविण्यासाठी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत अमरावतीत जाणार असल्याची माहिती आहे. महायुतीतील घटकपक्षांच्या बैठकीत बंडखोरीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. या चर्चेतून अमरावतीतील पेच सुटतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



अमरावतीतील घडामोडींमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमरावतीत भाजपच्या बंडखोर उमेदवारामुळे शिवसेनेची कोंडी झाल्यास पुण्यात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देऊ शकते, अशी चर्चा आहे. तसे सूतोवाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मदत केल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देऊ शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


अमरावतीत भाजपचे शेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या बंडखोरीचाही पेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये भाजपचे बंडखोर अनिल सोले यांची नाराजी दूर केल्यानंतर अमरावतीतही त्याच धर्तीवर तोडगा काढला जाणार का, याबाबत उत्सुकता आहे. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी नेते त्यांच्या भेटी घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.



परस्पर समन्वयाचे आव्हान


दरम्यान, अमरावतीतील सांस्कृतिक भवन येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदार बच्चू कडू यांचीही उपस्थिती राहणार आहे.


पाच जागांच्या निवडणुकीत महायुतीत काही ठिकाणची बंडखोरी रोखण्यात पक्षांना यश आले असले, तरी काही मतदारसंघांतील पेच कायम आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करताना मित्रपक्षांशी समन्वय राखण्याचे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे. अमरावतीतील चर्चेतून निघणारा तोडगा पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकतो.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म