Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

ट्रेलर पाहून लोकांना वाटते की या वेळी विजय नक्कीच दमदार पुनरागमन करेल. पण चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला की प्रेक्षकांच्या पदरी निराशाच पडते. 'लिगर', 'फॅमिली स्टार' असो किंवा 'किंगडम', त्याच्या प्रत्येक चित्रपटाबाबत हेच घडले आहे. आता त्याच्या 'रणबाली' या नव्या चित्रपटाच्या बाबतीतही दुर्दैवाने हाच कित्ता गिरवला गेला आहे.

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली की, दिग्दर्शक आणि विजयची जोडी पाहून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होते. ट्रेलर पाहून लोकांना वाटते की या वेळी विजय नक्कीच दमदार पुनरागमन करेल. पण चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला की प्रेक्षकांच्या पदरी निराशाच पडते. 'लिगर', 'फॅमिली स्टार' असो किंवा 'किंगडम', त्याच्या प्रत्येक चित्रपटाबाबत हेच घडले आहे. आता त्याच्या 'रणबाली' या नव्या चित्रपटाच्या बाबतीतही दुर्दैवाने हाच कित्ता गिरवला गेला आहे.



काय आहे 'रणबाली'ची कथा आणि पार्श्वभूमी ?


हा चित्रपट १८७६ ते १८७८ मधील 'ग्रेट मद्रास फामिन' म्हणजेच भयंकर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. इतिहास, ॲक्शन आणि पौराणिक लोककथेचा मेळ घालण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे. यामध्ये विजय देवरकोंडाने रायलसीमा क्षेत्रातील 'सिंगनमला बोब्बिली रणबाली' या शूर योद्ध्याची भूमिका केली आहे, जो ब्रिटीश जुलूमाविरुद्ध लढा देतो. रश्मिका मंदाना (rashmika Mandana) हिने त्याच्या पत्नीची (जयम्मा) भूमिका साकारली असून ती त्याचा मुख्य भावनिक आधार आहे. तर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते अर्नोल्ड वोस्लू (Arnold Vosloo) यांनी क्रूर ब्रिटीश अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. 'भद्रमल्लाना' या लोककथेवर आधारित या चित्रपटाची मूळ संकल्पना खूप मोठी होती, पण पडद्यावर ती मांडताना पूर्णपणे कोलमडली आहे.



रेंगाळलेली पटकथा आणि विस्कळीत प्रवाह


चित्रपटाची सुरुवात एका सुंदर पारंपरिक लोककथेने होते, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावतात. परंतु, अवघ्या १५ ते २० मिनिटांतच कथेचा वेग मंदावतो. ब्रिटीशांचा छळ आणि सूडाच्या एकाच चक्रात कथा अडकून पडते. चित्रपटाचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्याचा विस्कळीत प्रवाह! हिरोच्या एन्ट्रीचा सीन प्रेक्षकांमध्ये जो जोश निर्माण करतो, तो सीन पूर्ण होण्याआधीच अचानक संपतो. प्रेक्षकांना एका सीनाचा पूर्ण आनंद घेता येण्याआधीच पुढचा सीन सुरू होतो, ज्यामुळे चित्रपट पाहताना थकवा जाणवतो. त्यातच गरजेपेक्षा जास्त मेलोड्रामा भरल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होतो.



तांत्रिक बाजू मजबूत, पण भावनांचा अभाव


कथेच्या बाबतीत चित्रपट मार खात असला, तरी तांत्रिकदृष्ट्या तो अतिशय उत्तम बनवला आहे. जिष्णू भट्टाचार्जी आणि नीरव शाह यांचे छायांकन (Cinematography) अप्रतिम आहे. त्या काळातील वातावरण, भव्य सेट आणि कपड्यांची रचना अगदी हुबेहूब केली आहे. चित्रपट दिसायला एखाद्या महाकाव्यासारखा (Epic) भव्य वाटतो, पण दुर्दैवाने पडद्यावर घडणाऱ्या प्रसंगांशी प्रेक्षक भावनिकदृष्ट्या जोडले जात नाहीत. अजय-अतुल यांचे संगीतही चित्रपटाच्या भव्यतेला साजेसे ठरलेले नाही, त्यामुळे गाणी आणि पार्श्वसंगीत म्हणावा तसा प्रभाव पाडू शकत नाही.



कलाकारांची मेहनत आणि उणिवा


विजय देवरकोंडाने या भूमिकेसाठी शरीरयष्टी आणि राहणीमानात मोठा बदल केला आहे. त्याची मेहनत प्रत्येक दृश्यात स्पष्ट दिसते. परंतु, एका चांगल्या अभिनेत्याला तितक्याच ताकदीच्या पटकथेची साथ लागते, जी इथे मिळाली नाही. 'रणबाली' हा पात्र म्हणून फक्त लढताना आणि हाल सोसताना दिसतो, पण त्याच्या मनातील खळबळ किंवा त्याची वैचारिक वाढ प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. रश्मिका मंदाना आणि विजयची पडद्यावरील केमिस्ट्री गोड वाटते, पण ब्रिटीश पात्रांच्या संवादांच्या डबिंगमुळे खलनायकाची पकड ढिली पडते. दिग्दर्शक राहुल सांकृत्यायन यांनी इतिहासातील एक दुर्लक्षित आणि महत्त्वाचा अध्याय मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. चित्रपटात काही क्षण नक्कीच प्रभावित करतात, पण रेंगाळलेली कथा, कमकुवत पात्रे आणि अपूर्ण वाटणारे प्रसंग यामुळे चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर, 'रणबाली' चित्रपट कागदावर युद्धाच्या मोठ्या हुंकारासारखा वाटतो, पण थिएटरमध्ये तो प्रेक्षकांना झोप आणणारी 'अंगाई' ठरतो! विजय देवरकोंडासाठी हा चित्रपट म्हणजे पुन्हा एकदा हुकलेली मोठी संधी आहे.

Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या