Crime News : ठाण्यात खतरनाक प्रकार! १७ वर्षीय मित्राची हत्या करून मृतदेह जाळला अन् थेट पोलीस चौकीजवळच पुरला

ठाण्यातील कासारवडवली परिसरात अवघ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रज्योत कांबळे असे मृत मुलाचे नाव असून, तो काही दिवसांपासून रहस्यमयी रीतीने बेपत्ता होता.

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे (Thane Crime News) शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर का आणणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील कासारवडवली परिसरात अवघ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रज्योत कांबळे असे मृत मुलाचे नाव असून, तो काही दिवसांपासून रहस्यमयी रीतीने बेपत्ता होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करूनही प्रज्योतचा कोणताही पत्ता लागला नाही, अखेर हताश होऊन त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तो गायब असल्याबाबतची अधिकृत तक्रार नोंदवली होती.

पोलीस चौकीच्या शेजारीच पुरला मृतदेह


प्रज्योत अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडे कसून चौकशी केली, परंतु त्याचा काहीच सुगावा लागला नाही. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे (Technical Analysis) आणि खबऱ्यांच्या आधारे गोपनीय तपास सुरू केला. तपासादरम्यान गुरुवारी रात्री पोलिसांना एक धक्कादायक माहिती हाती लागली, ज्याने पोलिसांनाही चक्रावून सोडले. कासारवडवली परिसरातील एका पोलीस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच शेजारीच जमिनीत पुरलेल्या अवस्थेत प्रज्योतचा मृतदेह पोलिसांना सापडला.


पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न


प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हा गुन्हा केला आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या आणि पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह आधी जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो जमिनीत गाडून टाकला. घटना अतिशय संवेदनशील असून थेट पोलीस चौकीच्या अगदी जवळच मृतदेह पुरण्यात आल्याने ठाणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान मित्रांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, दुसरा फरार


या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत कासारवडवली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि संशयितांचा शोध घेतला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तर या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या हत्येमागे नेमका कोणता अंतर्गत विवाद होता किंवा यात इतर कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
Comments
Add Comment

Vasai Open Drain Accident : वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी

वसई (प्रतिनिधी) : वसई पूर्वेतील वालीव परिसरात घरामागील उघड्या गटारात पडून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 17 आणि 18 ऑक्टोबरला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे, 26 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

माफी नाही! निळ्या ड्रम हत्याकांडानंतर आता 'साप कांडा'तील दोषींनाही फाशी, मेरठ न्यायालयाचा निर्णय

निळ्या ड्रम हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आणखी एका प्रकरणात