पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम
भारतीय महिला क्रिकेटचं नेतृत्व आता स्मृती मंधानाच्या हाती आलं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपासून संघाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेत स्मृती मंधानाच्या रडारवर एक मोठा विक्रम आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत..
October 16, 2026 02:02 PM
1/5 भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेपासून स्मृती मंधाना टीम इंडियाची पूर्णवेळ कर्णधार असणार आहे. यापूर्वी तिने हरमनप्रीत कौरच्या गैरहजेरीत नेतृत्व सांभाळलं आहे. मात्र पूर्णवेळ कर्णधाराची जबाबदारी या मालिकेपासून सांभाळणार आहे. (Photo: ANI)
2/5 झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत स्मृती मंधानाला एक मैलाचा दगड गाठण्याची सुवर्णसंधी आहे. आतापर्यंत क्रिकेट जगात हा मैलाचा दगड कोणत्याही फलंदाजाला गाठता आलेला नाही. पुरूष आणि महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी पहिल्यांदा करण्याची संधी स्मृती मंधानाकडे आहे. (Photo: ANI)
3/5 स्मृती मंधाना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी पहिली खेळाडू ठरणार आहे. यासाठी तिला फक्त 133 धावांची गरज आहे. मंधानाने 179 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील 172 डावात 4867 रन्स केले आहेत. या दरम्यान तिने 2 शतकं आणि 37 अर्धशतकं ठोकली आहेत. (Photo: ANI)
4/5 झिम्बाब्वेविरुद्ध भारत तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यात तीन सामन्यात 133 धावा करणं स्मृती मंधानाला सहज शक्य आहे. भारतातच ही मालिका असल्याने स्मृती मंधानाला खेळपट्ट्यांचा अंदाज आहे. त्यामुळे या मालिकेतच हा विक्रम गाठेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. (Photo: ANI)
5/5 भारत आणि झिम्बाब्वे क्रिकेट मालिका खास असणार आहे. कारण दोन्ही देशातील महिला संघात पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका होत आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo: ANI)