
शिमला
शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान शिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे.
किन्नौरकिन्नौर त्याच्या सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बर्फाने झाकलेल्या दऱ्या स्वर्गासमान भासतात. सफरचंदाच्या बागा आणि लाकडांची घरे आणि बर्फाळ गिरीशिखरे या जागेला स्वर्ग बनवतात. येथील शांतता आणि ताजी हवा प्रसन्न करते.
लाहौललाहौल स्पीतीची खोरे थंडीत वेगळचे असते. गोठलेलया नद्या आणि बर्फाने झाकलेले बौद्ध मठ आणि सुनसान खोरे साहसी पर्यटकांना खुणावत असते. येथील थंडी मात्र जास्त खूप जास्त असते. त्यामुळे येथील दृश्य आयुष्यभर लक्षात रहातात.
चंबाचंबा हिवाळ्यात पोस्टकार्ड सारखे सुंदर दिसते. येथे प्राचीन मंदिरे आणि पारंपारिक घरे बर्फाच्या खाली लपली जातात, त्यामुळे ती जास्तच मनमोहक दिसतात. गर्दीपासून वेगळे असलेले चंबा शांतता आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
मनालीमनालीत देखील पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत. सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. मनालीमध्ये स्कीईंग, स्नो स्कूटर आणि स्नोबोर्डिंग सारख्या एडव्हेंचरची मजा घेता येते. बर्फाने झाकलेले पर्वत आणि वाहणारी ब्यास नदी मनालीला मनमोहक बनवते. व्हेवी स्नोफॉलच्या वेळेस अनेक रस्ते बंद केले जातात.






