Vasai Open Drain Accident : वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी

वसई पूर्वेतील वालीव परिसरात घरामागील उघड्या गटारात पडून अंकुश शाहदेव तुरिया या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा गटारात पडल्याचे समजताच वडिलांनी तातडीने त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उघड्या गटारांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसई (प्रतिनिधी) : वसई पूर्वेतील वालीव परिसरात घरामागील उघड्या गटारात पडून अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री घडली. अंकुश शाहदेव तुरिया असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. मुलगा गटारात पडल्याचे समजताच वडील शाहदेव तुरिया यांनी क्षणाचाही विलंब न करता गटारात उडी मारून त्याला बाहेर काढले. मात्र, गटारातील पाणी नाकातोंडात गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उघड्या गटारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वालीव परिसरातील रहिवासी असलेले शाहदेव तुरिया (२७) हे गुरुवारी कामावरून घरी परतले होते. घरी आल्यानंतर ते जेवण करत असताना त्यांनी मुलगा अंकुशला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवले होते. रात्री सुमारे ११.३५ वाजण्याच्या सुमारास परिसरात अचानक आरडाओरडा सुरू झाला. घरामागील गटारात अंकुश पडल्याचे नागरिकांनी शाहदेव यांना सांगितले.


मुलगा गटारात पडल्याचे कळताच शाहदेव यांनी कोणताही विचार न करता गटारात उडी घेतली आणि अंकुशला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत गटारातील पाणी त्याच्या नाकातोंडात गेले होते. मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी तातडीने धाव घेतली, परंतु दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.अंकुशला तातडीने नालासोपारा पूर्वेतील नागिंदासपाडा येथील वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. अवघ्या दोन वर्षांच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान,उघड्या गटारांमुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रहिवासी परिसरातील गटारे उघडी असल्यास अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक जिल्ह्यात 17 आणि 18 ऑक्टोबरला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे, 26 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

Nashik : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Crime News : ठाण्यात खतरनाक प्रकार! १७ वर्षीय मित्राची हत्या करून मृतदेह जाळला अन् थेट पोलीस चौकीजवळच पुरला

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे (Thane Crime News) शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर का आणणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील

माफी नाही! निळ्या ड्रम हत्याकांडानंतर आता 'साप कांडा'तील दोषींनाही फाशी, मेरठ न्यायालयाचा निर्णय

निळ्या ड्रम हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आणखी एका प्रकरणात