
राजकुमार रावचा ‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळाले. या सिनेमात राजकुमार रावने उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. तसेच मराठी अभिनेता ललित प्रभाकरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी ललितचं कौतुक केलं आहे.(UJJWAL NIKAM)
सलमान खानने गेलया तीन दशकांहून अधिक काळ 'भाईजान' म्हणून बॉलीवूड विश्वात अधिराज्य गाजवले आहे. ९० च्या दशकात ऍक्शन आणि रोमँटिक अभिनेता म्हणून ...
उज्ज्वल नियम यांची प्रतिक्रिया
ललित प्रभाकरने आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. मराठी चित्रपटसृष्टी गाजवून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही पदार्पण केले. जेव्हा तुम्हाला कळले की ललित कसाबची भूमिका साकारणार आहे. तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? असं विचारले तेव्हा उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘सॉरी पण मी ललितला एवढं ओळखत नव्हतो. राजकुमार रावलाही ओळखत नव्हतो, पण जेव्हा मी अजमल कसाब म्हणून पाहिलं ना तेव्हा त्याचा अभिनय खूप छान वाटला. कसाबची हसण्याची पद्धत, त्याची नजर, त्याचा अभिनय अगदी हुबेहूब केला आहे. कारण मी कसाबला रोज बघितले आहे त्यामुळे मी त्याची नजर आणि त्याचा आवाज विसरू शकत नाही.(LALIT PRABHAKAR)
‘ललितचं कौतुक कराव तितक कमी आहे. पण, ललितला चित्रपटात कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर दोन थोबाडीत माराव्याशा वाटतात इतकं उत्कृष्ट काम केलं आहे. असं वाटतं होता की कसाबच माझा समोर उभा आहे' असंही उज्ज्वल निकम पुढे म्हणाले. याच मुलाखतीत ललितही पुढे म्हणाला की, ‘ही खूपच मोठी पोचपावती आहे माझासाठी, पण यामागे पूर्ण टीमचं कौतुक आहे. मला लोक एक उत्तम अभिनेता म्हणून बघतात माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेम देतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकेतून दिसत राहीन आणि प्रेक्षांचे मनोरंजन करेन आणि त्यातून मिळणार प्रेम हे माझ्यासाठी खूप महत्वाचे असेल.
प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील कायदेशीर शुक्लकाष्ट संपण्याचे नाव ...
कसाबचा भूमिकेबद्दल बोलताना ललित प्रभाकरने व्यक्त केले मत
ललित प्रभाकर म्हणाला की, ‘थोडं काम करावं लागलं त्या भिकेसाठी. हिंदी, पंजाबी, उर्दू या भाषांवर थोडंसं काम केलं. व्हिडिओमधून सगळं समजून घेतलं. त्याची बोलण्याची पद्धत, तो काही शब्द वारंवार वापरायचा अशा सगळ्या गोष्टी नीट जाणून घेतल्या.’



