Saturday, October 17, 2026

BMC : महापालिका तथा ग्रीन बाँड्सच्या हालचाली जोरात; बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरता महापालिकेची निविदा

मुंबई महापालिका अर्थात BMC कडून ग्रीन बाँड्स जारी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ग्रीन बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेने निविदा काढली आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणपूरक विकासासाठी निधी उभारण्याच्या संभाव्य योजनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प यासारख्या शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ग्रीन बाँडस् काढण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन बॉँडसची पुढील प्रक्रिया सुलभपणे हाताळण्यासाठी तसेच सेबीशी पाठपुरावा तसेच समन्वय राखण्यासाठी आता सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेने या सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यासाठी निविदा जाहिरात प्रसिध्द केली आहे.

महापालिकेच्या ग्रीन बाँड्सच्या या उपक्रम भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी तसेच नेट झिरो या ध्येयाशी सुसंगत असून मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याची अंमलबजावणी सुलभ होईल. यामुळे, पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय या बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित होतील. शाश्वत विकासासाठी महानगरपालिका बाँडस् निर्गमित करण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प २०२६ मध्ये, अमृत २.० मिशन अंतर्गत अनुदानासह एकाच वेळी निर्गमित केलेल्या ११००० कोटीच्या महानगरपालिका बाँडस करता १०० कोटी एवढे अनुदान जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेने क्रेडीट रेटींग एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली आहे असून आता शाश्वत विकासाकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिका ग्रीन बाँडस् काढण्याची प्रक्रिया राबवत आहे.

मुंबई महापालिकेने या बाँड्सची प्रक्रिया राबवण्यासाठी आणि सेबीसी समन्वय साधण्यासाठी सल्लागार संस्थेची निवड करण्याच्यादृष्टीकोनातून जाहिरात प्रसिध्द केली आहे. यामध्ये महापालिका रोखे अर्थात म्युनिसिपल बाँड्स तथा ग्रीन म्युनिसिपल बाँड्स काढण्यासाठी या सल्लागार संस्थेची तथा डिबेंचर ट्रस्टीची निवड करण्यासाठी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. महापालिका रोख्यांचा हा संपूर्ण कालावधी किमान ५ ते कमाल १५ वर्षे अपेक्षित मानला आहे.

यामध्ये पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय या बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित होतील,असा विश्वास प्रशासनाला वाटत आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने २.४४ कोटी रुपयांचे प्रकल्प कामे हाती घेण्यात आलेली असून सध्या महापालिकेची सुमारे ७९ कोटी रुपये मुदतठेवींमध्ये गुुंतवण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेने "पर्यायी वित्तपुरवठा/ इतर माध्यमांतून निधी उभारण्यासाठी, वित्तीय धोरण, कर्ज व्यवस्थापन व संस्थात्मक समन्वय सहाय्यासह, " प्रकल्प अंमलबजावणी संस्था" नियुक्ती करण्याबाबतची निविदा मागवली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >