BMC : महापालिका निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर १२.७८ लाखांचा खर्च; छपाई पेक्षा बॅनर लावणे आणि काढण्यावरच अधिकच खर्च

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर तब्बल 12.78 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जाहिरातींच्या छपाईपेक्षा बॅनर लावणे आणि काढण्यावर अधिक खर्च झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या जनजागृतीसाठी लावलेल्या जाहिरातींवरच चक्क साडेबारा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. उत्सव लोकशाहीचा, गर्व मुंबईचा या नागरी संदेशासाठी या जाहिरात प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. यासाठी तब्बल साडे बारा लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये छपाई पेक्षा बॅनर लावणे आणि काढणे यावरच दुप्पट खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे.



मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनातून २४ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या काळात 'उत्सव लोकशाहीचा, गर्व मुंबईचा' हे नागरी संदेश महापालिका हद्दीतील जाहिरात फलकांवर प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी फ्लेक्स छपाई, फलकांवर चढविणे व उतरविणे ही कामे अल्प मुदतीत पूर्ण निविदा मागवून पूर्ण करण्यात आली आहे.


यासाठी प्रत्यक्षात सुमारे ९६,२८२ चौ. फूट फ्लेक्सचे काम झाले. यामध्ये छपाईकरता ६.५३ लाख रुपये तसेच जाहिरात फलक चढवणे आणि उतरवणे यासाठी ६.२४ लाख रुपये खर्च करण्यात आले.

Comments
Add Comment

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच

BMC News : विद्याविहार रेल्वे पुलाचा खर्च वाढला १० कोटींनी; इमारती वाचवण्यासाठी पुलाचा रस्ता मार्ग बदल्याने वाढला खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्‌डाण

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच

BMC : महापालिका तथा ग्रीन बाँड्सच्या हालचाली जोरात; बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरता महापालिकेची निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प

मध्य रेल्वेचा कसारा येथे मेगाब्लॉक; 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेवर आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या