काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! दिल्ली- मुंबई एक्सप्रेस- वेवर मिनीबस नाल्यात कोसळून 8 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात देवदर्शनासाठी जात असणाऱ्या मिनीबससोबत शनिवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण रस्ता अपघाताची घटना घडलीये.

जयपूर: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात शनिवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण रस्ता अपघात घडला. या भीषण अपघाताच्या घटनेमुळे मध्यप्रदेशामध्ये शोककळा परसली आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर प्रवाशांनी भरलेली एक मिनी बस (टेम्पो ट्रॅव्हलर) अनियंत्रित होऊन पुलावरून सुमारे 15 फूट खाली नाल्यात कोसळली. ही मिनी बस मध्यप्रदेशातून राजस्थानला देव दर्शनाकरिता चालली होती. या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, 25 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली मिनीबस मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून राजस्थानमधील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या 'खाटूश्यामजी'च्या दर्शनाकरिता निघाली होती. या बसमध्ये 25 हून अधिक भाविक देवदर्शनाकरिता चालले होते. ज्यापैकी बहुतांश भाविक मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (17 ऑक्टोबर) सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास, सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कराडिया टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. चालकाला अचानक झोप लागल्यामुळे बसवरील तांत्रिक नियंत्रण सुटले आणि गाडी थेट पुलावरून खाली नाल्यात जाऊन कोसळली, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.



बसचे तांत्रिक नियंत्रण सुटल्यामुळे गाडीने थेट पुलावरील कठड्यांना धडक देऊन बस थेट खाली नाल्यात जाऊन कोसळली. या धडकेत बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यावरून बस अपघाताची भीषणता समजत आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहारकार माजला. प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत बसच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रचंड कठीण काम केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थलावर दाखल झाले. कोटा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीलेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बसचालकासह 8 जणांचा मृत्यू झाला आहे.



अपघातामध्ये मृत पावलेल्यांमध्ये 8 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये अरुणा, वैष्णवी, त्रिशा, कृष्णा, अनिता, ओम सूर्यवंशी आणि राजू यांचा समावेश आहे. तर, जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये वंदिता, अजय गावंडे, वेदांत झरबडे, मोहनिस झरबडे, आकांक्षी झरबडे, हेमलता गायकवाड आणि सारांश यांचा समावेश आहे. यामध्ये अनेक भाविकांचा समावेश आहे. स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे भाविकांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Comments
Add Comment

CJI Surya Kant Advice to Young Lawyers : केवळ कायदेतज्ज्ञ बनू नका, तर समाजाचे 'संदेशवाहक' व्हा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे युवा वकिलांना आवाहन

बंगळुरू : कायद्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारे भावी वकील केवळ पुस्तकी ज्ञानावर मोठे होत नाहीत, तर त्यांच्याकडे

Greater Noida News : ग्रेटर नोएडामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नूडल्स खाल्ल्याने फूड पॉइजनिंगचा प्राथमिक संशय!

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामधून (Greater Noida) एक अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना

गुजरात हादरले! भरूचमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

भरूच (गुजरात) : गुजरातच्या भरूच जिल्ह्यात एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला

Delhi mumbai expressway Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खातूश्यामजीच्या दर्शनासाठी निघालेल्या ८ भाविकांचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

शनिवारी सकाळी राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेशातील (Madhyapradesh) खातूश्यामजी

Tech Addiction : लहान मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याची वेळ आलीय? सुप्रीम कोर्टाची केंद्राला मोठी नोटीस

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक पालकाची एकच डोकेदुखी असते ती म्हणजे, "माझं मूल दिवसभर मोबाईल आणि सोशल मीडियावर काय

रशियन तेल खरेदीवर भारताला टॅरिफमधून सूट, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, भारतासह 'या' पाच देशांना दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या भारतासह पाच देशांना