Madhuri Dixit Photos: आजही 'लाखों दिलों की धडकन' म्हणून चाहत्यांमध्ये फेमस असणार्या माधुरीच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये सौंदर्याची, लूकची आणि तिच्या स्टाईलची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा नवा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
1/6 अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले आहे. अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून प्रकाशझोतात राहणाऱ्या माधुरीच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
2/6 माधुरी दीक्षित सध्या चाहत्यांना नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून चर्चेत राहणारी माधुरी आता 'कोण होणार करोडपती'चं होस्टिंग करत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्री नव्या भूमिकेत दिसतेय. या शोनिमित्त अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीमध्ये एकदम खास फोटोशूट केले आहे.
3/6 गुलाबी रंगाची जॉर्जट साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. फुल्ल स्लिव्हज असलेलं ब्लाऊज कॅरी करत अभिनेत्रीने आपला संपूर्ण लूक केलेला आहे. अभिनेत्रीच्या निस्सिम सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
4/6 स्टायलिश ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्टायलिश लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. माधुरी दीक्षितचा मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. फॅन्समध्ये कायमच तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा असते.
5/6 'कोण होणार करोडपती'च्या शोनिमित्त माधुरी सध्या स्टायलिश लूक करत सोशल मीडियावर खास फोटोशूट करत असते. तिच्या फॅशनची आणि सौंदर्याची कायमच चाहत्यांवर भुरळ पडलेली आहे.
6/6 गुलाबी साडीमध्ये शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून माधुरीच्या लूकचे कौतुक केले जात आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.