Saturday, October 17, 2026

Nashik : नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण, 24 तासात कधीही धान्य मिळणार

स्वस्त धान्य दुकानांसमोरील रांगा, वेळेची अडचण आणि वितरणातील मानवी त्रुटी दूर करून सामान्य लाभार्थ्यांना सन्मानाने अन्नधान्य मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अन्नपूर्ति एटीएमचं लोकार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   1/4 स्वस्त धान्य दुकानांवरील रांगा, वेळेची अडचण आणि वितरणातील पारदर्शकतेचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. जागतिक अन्न कार्यक्रम यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली ‘अन्नपूर्ती’ स्वयंचलित धान्य वितरण प्रणाली म्हणजेच ‘धान्य एटीएम’ नाशिकमध्ये कार्यान्वित झाली आहे.
2/4 हे केंद्र दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू राहील. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार कधीही धान्य घेता येईल. आणि विशेष म्हणजे केवळ ३५ सेकंदात २५ किलोपर्यंत धान्याचे अचूक वितरण करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे.
3/4 आधार कार्डवर आधारित फिंगरप्रिंट (बायोमेट्रिक) प्रमाणीकरण केल्यामुळे अन्नधान्य वितरणात ९९.९९% अचूकता राहील आणि गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसेल. सोबतच या एटीएमची साठवणूक क्षमता २५०० किलोग्रॅम (२५ क्विंटल) इतकी असून, याद्वारे गहू आणि तांदळासह विविध धान्यांचे पारदर्शक व सुरक्षित वितरण केले जाईल.
4/4 नाशिक रोड येथील गोरेवाडी रोड, डिस्टिलरी क्वार्टर परिसरात हा पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे रेशनधारकांना वेळेचे बंधन न राहता हक्काचे धान्य सहज उपलब्ध होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >