Saturday, October 17, 2026

Vivek Oberoi Dubai House Tour: मुंबई ते दुबई! विवेक ओबेरॉयच डोळे दिपवून टाकणारं घर पाहिलात का?

१,२२० कोटींची संपत्ती असलेला बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या दुबईतील आलिशान घराचे इन्साइड फोटोज

1/6 बॉलीवूड अभिनेता आणि दुबईतील बिझनेसमन विवेक ओबेरॉय सध्या आपल्या दुबईतील व्हिलामुळे चर्चेत आला आहे. 1,120 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक असलेला विवेक गेल्या पाच वर्षांपासून दुबईत स्थायिक असून कामानिमित्त मुंबईत येत असतो. त्याच्या या भव्य व्हिलामध्ये भारतीय संस्कृती आणि युरोपीय शैलीचा संगम पाहायला मिळतो. घरात सुंदर फर्निचर, व्हिंटेज आर्टवर्क, लाइव्ह किचन, मोठा स्विमिंग पूल आणि आउटडोअर लॉज आहे. विशेष म्हणजे विवेकच्या बागेत कढीपत्ता, मसाल्यांची रोपे आणि भाजीपाला पिकवला जातो, ज्यामुळे वाळवंटात असूनही त्याला भारतात असल्यासारखा अनुभव मिळतो. विवेक ओबेरॉयच्या या आलिशान व्हिलामध्ये अनेक गाड्या पार्क जागा आहे. मुख्य दरवाज्याजवळ सुंदर बाग आहे. घराच्या आत प्रवेश करताच एक सुंदर सजवलेली लिव्हिंग रूम आहे, तिथे भारतीय आणि युरोपीय शैलीचा मिलाफ पाहायला मिळतो.(VIVEK OBEROI) 2/6 घराच्या मुख्य दरवाजात एक बाग आहे, तिथे लागूनच एक ड्रॉइंग रूम आहे. रुममध्ये सोफा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर भिंतींवर आर्टवर्क लावलेले दिसते. "सगळे भारतीय कलाकारांनी तयार केलेले आहेत. बाकी सगळं प्रियांकाने आणि मी केलेले आहे. तिला व्हिंटेज शैली खूप आवडते,” असं विवेक ओबेरॉयने ‘द कर्ली टेल्स’ला सांगितले आहे.(HOUSE TOUR) 3/6 व्हिलाच्या मागच्या बाजूला एक सुंदर गोल टेबल असलेला डायनिंग एरिया देखील आहे. इथे मनोरंजनसाठी टीव्ही बसवण्यात आला आहे. कुटुंबाबरोबर वेळ घालवायला ही उत्तम जागा आहे. याला लागूनच एक सुसज्ज किचन आहे, त्याला ब्रेकफास्ट काउंटर आहे, ज्यामुळे ते लाइव्ह किचनसारखं वाटतं. 4/6 विवेक ओबेरॉयच्या या घरात अनेक रोपटी दिसत आहेत. लिव्हिंग एरियापासून ते व्हिलाच्या विविध कोपऱ्यांपर्यंत सगळीकडे वेगवेगळी रोपटी लावलेली आहेत. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ दुबईत राहणाऱ्या विवेक ओबेरॉयला गार्डनिंगची खूप आवड आहे. बागेतही त्यांचे झाडांवरील प्रेम दिसून येतं. कढीपत्ता व मसाल्यांची रोपं त्यांच्या बागेत आहेत. त्याचबरोबर ते सेंद्रिय भाजीपालाही पिकवतात. यामुळे दुबईत राहत असला तरी विवेकला भारतात असल्यासारखं त्याला वाटते. “हे सगळं बघून तुम्ही वाळवंटात राहताय, असं जाणवतच नाही,” असं विवेक म्हणाला आहे. 5/6 या व्हिलाचा बॅकयार्ड खूप मोठा आहे. इथे एक मोठा स्विमिंग पूल आहे. तसेच आउटडोर लॉज सुद्धा आहे. ही जागा निवडण्यामागचं कारण विवेक ओबेरॉयने सांगितले आहे. “प्रियांकाला अशी जागा हवी होती जिथे तिला पाणी दिसेल आणि दररोज सकाळी पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल.” 6/6 दरम्यान, विवेक दुबईतील एक यशस्वी बिझनेसमन असला, तरी तो आपल्या आयुष्यात साधेपणाला महत्त्व देतो. त्याला घरच्यांसोबत वेळ घालवायला खूप आवडते.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा