Vivek Oberoi Dubai House Tour: मुंबई ते दुबई! विवेक ओबेरॉयच डोळे दिपवून टाकणारं घर पाहिलात का?

१,२२० कोटींची संपत्ती असलेला बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या दुबईतील आलिशान घराचे इन्साइड फोटोज

1/6 बॉलीवूड अभिनेता आणि दुबईतील बिझनेसमन विवेक ओबेरॉय सध्या आपल्या दुबईतील व्हिलामुळे चर्चेत आला आहे. 1,120 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक असलेला विवेक गेल्या पाच वर्षांपासून दुबईत स्थायिक असून कामानिमित्त मुंबईत येत असतो. त्याच्या या भव्य व्हिलामध्ये भारतीय संस्कृती आणि युरोपीय शैलीचा संगम पाहायला मिळतो. घरात सुंदर फर्निचर, व्हिंटेज आर्टवर्क, लाइव्ह किचन, मोठा स्विमिंग पूल आणि आउटडोअर लॉज आहे. विशेष म्हणजे विवेकच्या बागेत कढीपत्ता, मसाल्यांची रोपे आणि भाजीपाला पिकवला जातो, ज्यामुळे वाळवंटात असूनही त्याला भारतात असल्यासारखा अनुभव मिळतो. विवेक ओबेरॉयच्या या आलिशान व्हिलामध्ये अनेक गाड्या पार्क जागा आहे. मुख्य दरवाज्याजवळ सुंदर बाग आहे. घराच्या आत प्रवेश करताच एक सुंदर सजवलेली लिव्हिंग रूम आहे, तिथे भारतीय आणि युरोपीय शैलीचा मिलाफ पाहायला मिळतो.(VIVEK OBEROI)

2/6 घराच्या मुख्य दरवाजात एक बाग आहे, तिथे लागूनच एक ड्रॉइंग रूम आहे. रुममध्ये सोफा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर भिंतींवर आर्टवर्क लावलेले दिसते. "सगळे भारतीय कलाकारांनी तयार केलेले आहेत. बाकी सगळं प्रियांकाने आणि मी केलेले आहे. तिला व्हिंटेज शैली खूप आवडते,” असं विवेक ओबेरॉयने ‘द कर्ली टेल्स’ला सांगितले आहे.(HOUSE TOUR)

3/6 व्हिलाच्या मागच्या बाजूला एक सुंदर गोल टेबल असलेला डायनिंग एरिया देखील आहे. इथे मनोरंजनसाठी टीव्ही बसवण्यात आला आहे. कुटुंबाबरोबर वेळ घालवायला ही उत्तम जागा आहे. याला लागूनच एक सुसज्ज किचन आहे, त्याला ब्रेकफास्ट काउंटर आहे, ज्यामुळे ते लाइव्ह किचनसारखं वाटतं.

4/6 विवेक ओबेरॉयच्या या घरात अनेक रोपटी दिसत आहेत. लिव्हिंग एरियापासून ते व्हिलाच्या विविध कोपऱ्यांपर्यंत सगळीकडे वेगवेगळी रोपटी लावलेली आहेत. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ दुबईत राहणाऱ्या विवेक ओबेरॉयला गार्डनिंगची खूप आवड आहे. बागेतही त्यांचे झाडांवरील प्रेम दिसून येतं. कढीपत्ता व मसाल्यांची रोपं त्यांच्या बागेत आहेत. त्याचबरोबर ते सेंद्रिय भाजीपालाही पिकवतात. यामुळे दुबईत राहत असला तरी विवेकला भारतात असल्यासारखं त्याला वाटते. “हे सगळं बघून तुम्ही वाळवंटात राहताय, असं जाणवतच नाही,” असं विवेक म्हणाला आहे.

5/6 या व्हिलाचा बॅकयार्ड खूप मोठा आहे. इथे एक मोठा स्विमिंग पूल आहे. तसेच आउटडोर लॉज सुद्धा आहे. ही जागा निवडण्यामागचं कारण विवेक ओबेरॉयने सांगितले आहे. “प्रियांकाला अशी जागा हवी होती जिथे तिला पाणी दिसेल आणि दररोज सकाळी पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल.”

6/6 दरम्यान, विवेक दुबईतील एक यशस्वी बिझनेसमन असला, तरी तो आपल्या आयुष्यात साधेपणाला महत्त्व देतो. त्याला घरच्यांसोबत वेळ घालवायला खूप आवडते.

 
Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

‘आम्ही जग सोडून जात आहोत’; गुरुग्राममध्ये आयटी कपलचा दुर्दैवी अंत

हरियाणातील गुरुग्राम येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे एक जोडपे बुधवारी

निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात टीपू सुलतानच्या घोषणा कशासाठी? - मंत्री नितेश राणेंचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे

रेशनवरून वाद, नॉमिनेशनचा फटका! नकुलनंतर आता कोणाची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट?

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली