दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारात 2026 मॉडेलची अपडेटेड हिरो एक्स्ट्रीम 160आर 4व्ही आणि अपडेटेड हिरो एक्स्ट्रीम 250आर कार्बन सादर केली आहे. एक्स्ट्रीम 160आर 4व्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.27 लाख रुपये, तर एक्स्ट्रीम 250आर कार्बनची किंमत 1.98 लाख रुपये आहे. दोन्ही मोटरसायकलमध्ये नवीन फीचर्स, आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि रायडरच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत.
एक्स्ट्रीम 160आर 4व्हीची किंमत आणि व्हेरिएंट
नवीन एक्स्ट्रीम 160आर 4व्ही स्टँडर्ड, प्रो आणि कार्बन अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 1.27 लाख रुपये, प्रोची 1.37 लाख रुपये आणि कार्बन व्हेरिएंटची किंमत १.४१ लाख रुपये आहे. या सर्व किंमती दिल्लीतील एक्स-शोरूम दरांनुसार आहेत. बुकिंग 17 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून, डिलिव्हरी १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची डिलिव्हरी जानेवारी 2027 पासून अपेक्षित आहे.
डिझाइन आणि फीचर्समध्ये बदल
नवीन एक्स्ट्रीम 160आर 4व्हीमध्ये सुधारित फ्युएल टँक डिझाइन, नवीन टँक एक्स्टेंशन आणि अधिक आकर्षक बॉडी पॅनेल देण्यात आले आहेत. टॉप कार्बन व्हेरिएंटमध्ये 4.2 इंचांची रंगीत टीएफटी स्क्रीन मिळते, तर इतर व्हेरिएंटमध्ये एलसीडी डिस्प्ले आहे. टीएफटी स्क्रीनसोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसारख्या सुविधा मिळतात. याशिवाय रायड-बाय-वायर तंत्रज्ञान, रेन, रोड आणि स्पोर्ट असे तीन रायडिंग मोड, क्रूझ कंट्रोल, पॅनिक ब्रेक अलर्ट, ड्युअल-चॅनेल एबीएस आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. या मोटरसायकलमध्ये 163 सीसीचे ऑइल-कूल्ड, चार-व्हॉल्व्ह इंजिन आहे. हे इंजिन सुमारे 17.1 पीएस पॉवर आणि 14.6 एनएम टॉर्क निर्माण करते. यासोबत पाच-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Tesla Roadster : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाची (Tesla) नवी रोडस्टर कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कारमध्ये विशेष थ्रस्टर तंत्रज्ञानाचा वापर ...
एक्स्ट्रीम 250आर कार्बनमध्ये प्रगत फीचर्स
अपडेटेड हिरो एक्स्ट्रीम 250आर कार्बनची किंमत 1.98 लाख रुपये आहे. ही मोटरसायकल कार्बन रेड, कार्बन ब्लॅक आणि कार्बन व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या मॉडेलमध्ये 249 सीसीचे लिक्विड-कूल्ड इंजिन असून, ते 30 पीएस पॉवर आणि 25.3 एनएम टॉर्क निर्माण करते. या बाइकमध्ये सहा-स्पीड गिअरबॉक्स, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, रायड-बाय-वायर तंत्रज्ञान आणि रेन, रोड, स्पोर्ट व ट्रॅक असे चार रायडिंग मोड देण्यात आले आहेत. याशिवाय क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (टीपीएमएस) यांसारखी फीचर्सही मिळतात.
4.2 इंचांची टीएफटी स्क्रीन आणि नवीन सस्पेन्शन
एक्स्ट्रीम 250आरमध्ये 4.2 इंचांची रंगीत टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि लॅप टाइमरसारख्या सुविधा आहेत. मागील सस्पेन्शनमध्ये फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग (एफएसडी) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सस्पेन्शनच्या डॅम्पिंगमध्ये बदल होण्यास मदत होते. या मोटरसायकलचे बुकिंग 17 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून, डिलिव्हरी 1नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि रायडर-केंद्रित फीचर्समुळे हिरोच्या या दोन्ही मोटरसायकल बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे.