IND vs WI : भारत वेस्ट इंडिज मालिकेचा नकोसा शेवट, भारताने 7.4 षटकात 118 धावा करूनही सामना ड्रा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. पाचव्या सामन्यात भारताने फलंदाजी केली, पण वेस्ट इंडिजच्या वाटेला फलंदाजी आलीच नाही. हा सामना ड्रॉ झाला आणि मालिका बरोबरीत सुटल्याची घोषणा करण्यात आली.
October 17, 2026 10:32 PM
IND vs WI : भारत वेस्ट इंडिज मालिकेचा नकोसा शेवट, भारताने 7.4 षटकात 118 धावा करून सामना ड्रा (Photo: ANI)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. चार सामन्यानंतर 2-2 अशी स्थिती होती. त्यामुळे पाचवा टी20 सामना निर्णायक होता. पण भारत आणि वेस्ट इंडिज सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला. त्यामुळे सामना उशीर झाल्याने षटकं कमी करण्यात आली. हा सामना 9 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला. पाऊस थांबल्यानंतर नाणेफेकीचा कौल घेतला आणि हा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला. खेळपट्टीचा अंदाज आणि धावांचा यशस्वी पाठलाग होत असल्याने वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने आक्रमक सुरूवात केली. तसेच 7.4 षटकात 4 गडी 118 धावा केल्या आणि पुन्हा पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खेळ थांबवला गेला. त्यानंतर हा सामना 5 षटकांचा खेळला जाईल असं सांगितलं गेल आणि डकवर्थ लुईस नियमानुसार 85 धावांचं टार्गेट दिलं गेलं. पण पाऊस थांबत नसल्याचं ड्रॉ झाल्याचं घोषित करण्यात आलं.
भारताचा डाव
भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी आली. पण अभिषेक शर्मा 4 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनने मोर्चा सांभाळला. या दोघांनी 10 चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. इशान किशन 10 चेंडत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 30 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमन 7 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतला. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 12 चेंडूत 22 धाव केल्या. श्रेयस अय्यर 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 6 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत नाबाद 24 धावा केल्या. तर तिलक वर्मा 7 धावांवर बाद आणि पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खेळ तिथेच थांबला.
मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने मुंबई इंडियन टीमच्या मुख्य ...
विक्रमी मालिका
दोन पूर्ण सदस्य देशांमधील द्विपक्षीय टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक रन-रेट नोंदवण्याचा जागतिक विक्रम वेस्ट इंडिजच्या 2026 मधील भारत दौऱ्यादरम्यान झाला आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी तब्बल 10.98 च्या सरासरी रन-रेटने धावा कुटल्या, जो क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावगतीचा विक्रम ठरला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा 2026 मधील भारत दौरा असून, त्यात 10.57 चा रन-रेट राखला गेला होता. तिसऱ्या क्रमांकावर 2025 मधील ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा (9.63 रन-रेट), चौथ्या क्रमांकावर 2026 मधील भारताचा इंग्लंड दौरा (9.36 रन-रेट) आणि पाचव्या क्रमांकावर 2023-24 मध्ये खेळवली गेलेली इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका (९9.21 रन-रेट) आहे.