मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना निलंबित केला आहे. फोर्टिस हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी अन्न तयार होणाऱ्या सोडेक्सो किचनमध्ये झुरळे, ड्रेनेजमध्ये अन्नकचरा, बुरशीयुक्त अन्नवाहतूक डबे आणि गंजलेले चाकू आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे FDA ने ही कारवाई केली आहे. थर्ड पार्टी आहार सेवा प्रदाता म्हणून स्वयंपाकघर चालवणाऱ्या मे. सोडेस्को इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावावर असलेला अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या स्वयंपाकघराच्या तपासणीनंतर करण्यात आलेले हे निलंबन, राज्य अन्न व स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर राज्य अन्न व औषध प्रशासनाकडून सुरु असलेल्या व्यापक कारवाईचाच एक भाग आहे.


ही कारवाई मुंबईतील इतर अनेक आस्थापनांवरही करण्यात आली. फोर्टिस हॉस्पिटलने म्हटले आहे की, त्यांनी या निरीक्षणांची गांभीर्याने दखल घेतली असून, आपल्या खाद्यसेवा पुरवठादाराला या त्रुटी दूर करण्याचे आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रुग्णांची सुरक्षितता, सेवेचा दर्जा आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे देखील फोर्टिस रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे.



फोर्टिस हॉस्पिटलने पुढे म्हटले आहे की, 'आमच्या बाह्य आहार सेवा पुरवठादाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणि संबंधित अन्न व्यवसाय परवाना असलेल्या, रुग्णालयातील स्वयंपाकघरासंदर्भात FDA कडून आलेल्या पत्राची नोंद घेतली आहे. राबवण्यात येत असलेल्या सुधारणात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सेवा पुरवठादाराशी समन्वय साधला जात आहे. “रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित, पौष्टिक जेवणाचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी, जिथे जिथे गरज आहे तिथे योग्य पर्यायी व्यवस्था केली जात आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच

BMC : महापालिका निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर १२.७८ लाखांचा खर्च; छपाई पेक्षा बॅनर लावणे आणि काढण्यावरच अधिकच खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या जनजागृतीसाठी लावलेल्या

BMC News : विद्याविहार रेल्वे पुलाचा खर्च वाढला १० कोटींनी; इमारती वाचवण्यासाठी पुलाचा रस्ता मार्ग बदल्याने वाढला खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्‌डाण

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच

BMC : महापालिका तथा ग्रीन बाँड्सच्या हालचाली जोरात; बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरता महापालिकेची निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प