मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने मुंबई इंडियन टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. महेला जयवर्धनने मुंबई इंडियन टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स टीमने शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी अर्थात आज अधिकृत निवेदन देत मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला ही महत्त्वाची बातमी दिली आहे. दरम्यान, आता जयवर्धननंतर कोणाच्या खांद्यावर मुंबई इंडियन टीमच्या कर्णधार पदाची धुरा पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आणि 1996 च्या ...
जयवर्धनेने आपल्या कॅप्टन्सीच्या वेळामध्ये मुंबई इंडियन्स संघाला तीनवेळा IPL चे विजेतेपदे मिळवून दिले आहेत. त्यामुळेच तो मुंबई इंडियन्सच्या यशस्वी कोचेसपैकी एक यशस्वी कोचेस ठरला आहे. महेला जयवर्धनने मुंबई इंडियन्ससोबत तब्बल नऊ वर्षे एकत्र काम केले आहे. 2017 साली पहिल्यांदा महेला जयवर्धनची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. शांत, शिस्तप्रिय आणि चतुर आपल्या मार्गदर्शनाखाली जयवर्धनने मुंबई इंडियन्स टीमने 2017, 2019 आणि 2020 अशा तीन वेळा जेतेपदावर आपले नाव कोरले. 2017 ते 2022 नंतर 2024 ते आजपर्यंत मुंबई इंडियन्स टीमचे कर्णधार पद सांभाळले. मध्यंतरी काही काळासाठी जयवर्धनकडे 'ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स'म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. यामाध्यमातून जयवर्धनकडे मुंबईच्या जगातील सर्व फ्रँचायझींच्या संघांवर नियंत्रण होते. त्यांनी आपल्या कर्णधारपदाच्या कार्यकाळामध्ये मुंबई इंडियन्स टीमला एक वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या रोमांचक ...
महेला जयवर्धनकडे दुसऱ्यांदा 2024 मध्ये जेव्हा कर्णधार पदाची धुरा देण्यात आली त्यावेळी त्याला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. मुंबई इंडियन्स टीमच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती केल्यानंतर टीमने फारशी दिलासादायक कामगिरी केली नाही. 2026 च्या लीगमध्ये मुंबईला फक्त 4 विजय मिळवता आले होते. त्यामुळे कदाचित आता मुंबई इंडियन्सचे सर्व मॅनेजमेंट बदलताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी महेला जयवर्धनेच्या योगदानाची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, "जयवर्धनेचे शांत नेतृत्व, सचोटी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा मुंबई इंडियन्स टीमसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. महेलाने गेल्या काही वर्षांत मुंबई इंडियन्स टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आम्ही त्याच्या नेतृत्वासाठी आणि वचनबद्धतेसाठी आभारी आहोत. त्यासोबत एकत्र केलेला प्रवास आणि एकत्र निर्माण केलेल्या आठवणी आम्ही नेहमीच जपून ठेवू. महेला नेहमीच आमच्या एका कुटुंबाचा भाग राहील."
श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धने निवृत्तीनंतर भावूक झाला. जयवर्धनने मुंबई इंडियन्सचे खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले. तसेच, आपल्या प्रवासात नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचा विश्वास, पाठिंबा आणि मैत्री यांचाही महत्त्वाचा वाटा होता, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. टीमसोबत जयवर्धनने अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले, अडचणींचा सामना केला आणि अशी कामगिरी केली ज्याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल. त्याने संघाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सचे त्याच्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान राहील.