अभिनेत्री राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश लवकरच ‘अक्का’ या आगामी सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. 1980 च्या दशकातील पार्श्वभूमी आधारित असलेल्या या सीरिजमध्ये गँगस्टर ड्रामा पाहायला मिळणार आहे. कीर्तीच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या सीरिजचा टीझर प्रदर्शित केला. त्याबरोबर सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. ‘अक्का’ ही सीरिज ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(AKKA SERIES)
टीझरमध्ये कीर्ती सुरेश भवानी या भूमिकेत दिसणार आहे. राधिका आपटे रुद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. सीरिजच्या टीजरमधून दोघींचीही भमिका प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांचे वेगवेगळे विचार आणि हितसंबंध यांमुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘अक्का’ या सीरिजच्या माध्यमातून धर्मराज शेट्टी दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले आहे. या सीरिजचं लेखनही त्यानेच केलं आहे. पिढ्यान्पिढ्या महिलांनी उभारलेल्या, सांभाळलेल्या आणि सुरक्षित ठेवलेल्या पेरनुरू या राज्यावरती या सीरिजची कथा अवलंबलेली आहे. परंपरा, सत्तासंघर्ष आणि प्रतिस्पर्धा याभोवती ही कथा फिरत आहे. यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेली ही सीरिज राधिका आपटे व कीर्ती सुरेशची ‘अक्का’ ही आगामी सीरिज येत्या 30 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
राजकुमार रावचा ‘प्रहार द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा सिनेमा 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळाले. या ...
कीर्तीने व्यक्त केलया भावना
वाढदिवसादिवशी या सीरिजचा टीजर प्रदर्शित झाल्याने तिचा वाढदिवस आणखी खास झाल्याचेही सांगितले. ‘भवानी’ ही व्यक्तिरेखा तिने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपैकी खूप वेगळी आणि लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी एक असल्याचेही तिने म्हटले आहे. “दरवर्षी चाहत्यांकडून मिळणारं खूप प्रेम माझ्यासाठी हा दिवस खूप खास बनवतं, चाहत्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात, असे कीर्तीने म्हंटले.(KIRTI SURESH)
राधिकाने रुद्रा भूमिकेबद्दल आणि सीरिजबद्दल काय म्हंटले आहे?
राधिका आपटे म्हणाली, “कीर्तीच्या वाढदिवशीच अक्का या सीरिजची प्रदर्शनाची तारीख जाहीर होणं आणि टीझर प्रदर्शित होणं, ही खूप छान गोष्ट आहे. यामुळे आमच्यासाठी हे वर्ष नक्कीच चांगलं ठरेल, अशी मला आशा आहे. 'रुद्रा' ही एक रंजक व्यक्तिरेखा आहे. तिचे स्वतःचे विचार आहेत. आजूबाजूच्या जगाला आव्हान देण्याची तिची वृत्ती आहे. या सीरिजमधील व्यक्तिरेखांचा स्वभाव आणि त्यांच्या वेगवेगळ्या विचारांमुळे निर्माण होणारा संघर्ष यामुळे मी या सीरिजकडे आकर्षित झाले.”(RADHIKA APTE)