
Nashik : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीतील एका विभागाला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार्यालयातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयातील एका विभागात अचानक आग लागली. काही वेळातच आगीने परिसरातील साहित्याला वेढा दिल्याने फर्निचर आणि कार्यालयीन कागदपत्रे जळून खाक झाली.
Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा राष्ट्रपतींचा नाशिक दौरा लक्षात घेता शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती ...
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आग येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कार्यालयातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




