Sunday, October 18, 2026

Obsession Movie: एक इच्छा आणि आयुष्याला अनपेक्षित वळण! काय आहे व्हायरल One Wish Willow?

8 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केली 4300 कोटींची कमाई 'obsession' चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर डंका

चित्रपटात जर हॉरर सीन्स असतील तर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढते. त्या भूकिमिकेबद्दल कुतूहल निर्माण होते. प्रेक्षकांमध्ये अनेकदा त्यांच्या शेवटच्या दृश्यांबद्दल, त्यातील लपलेल्या संकेतांबद्दल किंवा अचानक डचकवणाऱ्या प्रसंगांबद्दल चर्चा सुरु होते. मात्र, फार कमी चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांना भुरळ घालतात. एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण करतात. 'ऑब्सेशन' या चित्रपटाच्या बाबतीत नेमके हेच घडले आहे. हा या वर्षातील एक अनपेक्षित यशस्वी चित्रपट ठरला आहे. त्याने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करण्यासोबतच सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेज वाढली आहे. प्रेक्षक चित्रपटाचा शेवटचा पार्टबद्दल खूप उत्सूक आहेत. चित्रपटाच्या खरा खलनायक हा अस्वल आहे की दयवी शक्ती आहे याबद्दल कुतुहल निर्माण झाले असतानाच आणखी एका गोष्टीने स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे 'वन विष विलो'.(ONE WISH WILLOW)

One Wish Willow म्हणजे काय?

'One Wish Willow' ही एक काल्पनिक इच्छा पूर्ण करणारी वस्तू आहे. चित्रपटातील कथेनुसार, या वस्तूचा वापर करून एखादी व्यक्ती एक इच्छा मागू शकते. मात्र, ती इच्छा पूर्ण होताना अपेक्षेपेक्षा वेगळे आणि धक्कादायक परिणाम घडू शकतात. 'वन विश विलो' हे या चित्रपटातील सगळ्यात जास्त ओळखले जाणारे प्रतीक बनले आहे. चाहते त्याच्या प्रतिकृती विकत घेत आहेत. चाहते ही गोष्ट विकत घेऊन त्याचे प्रमोशन करताना दिसत आहे.या चित्रपटात, 'वन-विश विलो' एका अशा दुकानात विकले जाते जिथे विविध प्रकारचे स्फटिक आणि अलौकिक वस्तू मिळतात. वरवर पाहता, 'वन-विश विलो' अगदी साधे वाटते. याचा वापर करण्याच्या सूचनाही अत्यंत साध्या आहेत. विलोच्या फांदीचे दोन तुकडे करा, एक इच्छा मागा आणि ती पूर्ण होताना पहा.

One Wish Willow खरोखर इच्छा पूर्ण करते का?

ही प्रत्यक्षात जादुई शक्ती असलेली वस्तू नाही. ती चित्रपटासाठी तयार केलेली काल्पनिक संकल्पना आहे. तिच्या नावाने प्रतिकृती आणि प्रमोशनल वस्तूही उपलब्ध झालया आहेत.

'obsession' चित्रपटामध्ये नेमके काय आहे?

या कथेत 'बेअर' नावाचे पात्र आहे ज्याची भूमिका मायकल जॉन्स्टनने साकारली आहे. जो आपलया बालपणीची मैत्रीण निक्कीबद्दल जिची भूमिका इंडे नॅव्हारेटने साकारली आहे तिच्याबद्दल मनात एक गुप्त इच्छा बाळगतो. आपल्या मनातील खऱ्या भावना व्यक्त करता न आल्यामुळे, तो एका झाडाजवळ जातो आणि एक इच्छा व्यक्त करतो की निक्कीने जगातील इतर कोणापेक्षाही जास्त प्रेम फक्त त्याच्यावर करावे. त्याची इच्छा पूर्ण होते, पण ती त्याने जशी अपेक्षा केली होती तशी पूर्ण होत नाही.रोमँटिक नाते फुलण्याऐवजी, निक्कीची ओढ एका भयावह वळणावर पोहोचते. तिचे प्रेम सर्वव्यापी, वेड लावणारे आणि विनाशकारी बनते इतके की, ती स्वतःची पूर्वीची ओळख पूर्णपणे पुसून टाकते.(MICHAEL JOHNSTON)

इंटरनेटवर या चित्रपटाची एवढी चर्चा का आहे?

'वन विष विलो' बद्दलची ही चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीये. याचे संपूर्ण श्रेय चित्रपट निर्मात्यांना जाते, ज्यांनी कल्पनात्मक कथा आणि वास्तव यांच्यातील सीमारेषा अत्यंत कुशलतेने पुसून टाकली आहे. 'ऑब्सेशन' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यासाठी एक व्यापक प्रचार केला होता. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 'विलो' झाडाची प्रतिकृती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून विकली जात होती. 'वन विष विलो' नावाच्या या वेबसाइटनुसार, आता ही प्रतिकृती पूर्णपणे विकली गेली आहे.या चित्रपटाची क्रेज एवढी वाढली आहे की हा चित्रपट आता लवकरच चाहत्यांचा भेटीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.(INDE NAVARRETTE)

8 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 4300 कोटींची कमाई केली. कोणत्याही अपेक्षांशिवाय प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता हाच चित्रपट ओटीटीवर येणार आहे. 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉरर चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता जिओहॉटस्टार पीकॉक हबवर प्रदर्शित होणार आहे. हा हॉरर ब्लॉकबस्टर चित्रपट हॅलोविनची भेट म्हणून चाहत्यांचा भेटीला येणार आहे. या आधी हा चित्रपट इंग्रजी तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. 'ऑब्सेशन' हा चित्रपट अमेरिका आणि इतर देशांमध्ये 15 मे 2026 रोजी, तर भारतातील चित्रपटगृहांमध्ये 29 मे रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतातही प्रदर्शित झाला असून, त्याने सुमारे 100 कोटी रुपयांची कमाई करून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा