अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोजित संवाद सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सरनाईक यांच्या प्रचारासाठी अमरावतीत दाखल झालेल्यावर शिंदे यांनी शिक्षक, संस्थाचालक आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सरनाईक यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. “आपला हक्काचा माणूस निवडून द्यायचा आहे,” असे सांगत त्यांनी सरनाईक यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले.(EKNATH SHINDE)
रेवणे यांच्या माघारीबद्दल त्यांचे आभार मानताना शिंदे यांनी रवी राणा यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले. महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करत त्यांनी महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
कुडाळ तालुक्यातील कडावल वर्दे रस्त्यावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने यापूर्वी दोन टप्प्यांत अनुक्रमे ११०० कोटी आणि 960 कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचा दावा त्यांनी केला. उर्वरित अनुदानाबाबतही निर्णय घेण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या लाभार्थ्यांचे प्रश्न, आश्रमशाळा, दिव्यांगांच्या शाळा आणि शिक्षण क्षेत्रातील इतर मागण्यांवरही सरकार सकारात्मक असून, निवडणुकीनंतर शिक्षकांच्या प्रश्नांवर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. एकदा कमिटमेंट केली की मागे हटत नाही,” असे शिंदे म्हणाले.
शिक्षक हा नवीन पिढी घडवणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी किरण सरनाईक यांच्यामार्फत प्रभावीपणे पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.(KIRAN SARNAIK)
मतपत्रिकेवर किरण सरनाईक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी “तिसऱ्या क्रमांकावरून एक नंबरवर आणायचे आहे. पहिल्या पसंतीचे मत किरण सरनाईकांना द्या,” असे आवाहन केले. आपल्या संपर्कातील शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीच्या उमेदवारासाठी मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा संदर्भ देताना शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साथीने महायुती सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत, सवलती आणि दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.
नगर (प्रतिनिधी) : आदर्श गाव हिवरे बाजार येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन 2026-27 चा पाण्याचा ताळेबंद ...
“मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केले आणि आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार,” असे सांगत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 26 उमेदवार अंतिमतः रिंगणात असून, 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत युवा स्वाभिमानच्या उमेदवाराची माघार ही महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासाठी महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.
यावेळी आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय कुटे आमदार किशोरआप्पा पाटील, युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार ॲड. प्रीती रेवणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे, शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख सुनील डीके, अमरावती शहरप्रमुख संतोष भदे, सह - संपर्कप्रमुख श्याम देशमुख आणि शिवसेना भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.