मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर मुंबईतील जुहू परिसरात अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, या फायरिंगमध्ये टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत.
जुहू येथील पुष्पा पार्क जवळील घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रविवार (18 ऑक्टोबर 2026) रोजी संध्याकाळी जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात घडली. टायगर श्रॉफ एका मैदानावर फुटबॉल मॅच खेळून त्याच्या कारमधून घरी परतत होता. तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याच गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगरच्या गाडीवर 3 ते 4 राऊंड गोळीबार केला आणि तिथून पळ काढला.
चित्रपटात जर हॉरर सीन्स असतील तर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढते. त्या भूकिमिकेबद्दल कुतूहल निर्माण होते. प्रेक्षकांमध्ये अनेकदा त्यांच्या शेवटच्या ...
ड्रायव्हरसह दोघे जखमी; नानावटी रुग्णालयात उपचार सुरू
या गोळीबारात टायगर श्रॉफला कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी अधिकृत पुष्टी मुंबई पोलिसांनी दिली आहे. परंतु, त्याच्या कारच्या चालकाच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. तसेच जवळच उभा असलेला एक ऑटो रिक्षाचालकही यामध्ये जखमी झाला आहे. या दोन्ही जखमींना तात्काळ जुहू येथील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार; जुहू परिसरात खळबळ
.
.
#MumbaiNews #TigerShroff #Juhu #MarathiNews #prahaarnewsline #prahaarshorts
(ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात) https://t.co/JYOm8xPM1V
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) October 18, 2026
लॉरेन्स बिश्नोई गँगचा (Lawrence Bishnoi Gang) कथित दावा
या घटनेनंतर सोशल मीडियावरील एका पोस्टने पोलिसांची झोप उडवली आहे. एका कथित सोशल मीडिया पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये "जो कोणी सलमान खानसोबत काम करेल, त्याचा हाच गेम केला जाईल," अशी थेट धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस या सोशल मीडिया पोस्टची तांत्रिक बाजू तपासून पाहत असून हा दावा खरा आहे की नाही, याचा तपास करत आहेत.
मुंबई: करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो, 'कॉफी विथ करण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या ह्या शोचा नऊवा सीझन सुरू आहे. गेल्या एपिसोडमध्ये शोमध्ये, सलमान खान ...
मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये; 12 पथके तैनात
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून पुराव्यासाठी बुलेट जप्त केली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 12 विशेष पथके (Special Teams) तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री आणि मुंबईत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.