हॉर्लिक्स, नेस्कॅफे यांसारखे पदार्थ आपण हाडं मजबूत करण्यासाठी किंवा शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून वापरतो. या उत्पादनांच्या पॅकेजवर अनेकदा हाडे मजबूत करण्याचे, उत्तम पोषण देणारे पदार्थ असतात, साखर नसते असं नमूद केलेलं असतं. आपण पॅकेजच्या मागे असलेल्या या दाव्यांवर सर्रास विश्वास देखील ठेवतो. पण हे दावे नेहमीच खरे असतात का? या संदर्भात एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एफएसएसएआयने (FSSAI) नेस्ले इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांना त्यांच्या काही खाद्य उत्पादनांवरील दाव्यांमध्ये आणि लेबलिंगमध्ये असलेल्या कथित विसंगतींबाबत नोटीस बजावली आहे.
FSSAI has issued notices to Nestlé India Ltd. and Hindustan Unilever Ltd. regarding misleading claims and non-compliances.
Additionally, licenses have been suspended for M/s Sukhdarshan Pharma and M/s Bala Ji Food Products for serious food safety violations. 1(2) #FSSAINotice https://t.co/Nqf0VE3llt
— FSSAI (@fssaiindia) October 17, 2026
अन्न नियमकाच्या मते, हॉर्लिक्सची न्यूट्रिशन ड्रिंक आणि नेस्कॅफेच्या रेडी टू ड्रिंक उत्पादनांसह काही उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आणि ऑनलाईन सूचीमध्ये केलेले दावे नियमांशी विसंगत असल्याचे आढळले आहे. FSSAI ने यासंदर्भात कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. FSSAI ला एचयूएलच्या (HUL) हॉर्लिक्स वुमेन्स प्लस चॉकोलेट न्यूट्रिशन ड्रिंकच्या लेबलवरील अनेक दावे खोटे आढळले आहेत. हे उत्पादन हाडे मजबूत करण्याचा, सहा महिन्यांत हाडांची ताकद सुधारण्याचा आणि हाडांचे आरोग्य सुधारण्याचा दावा करते. नियमकाने उत्पादनाच्या हेल्दी मसल्स या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.सोबतच 'नो शुगर' या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या उत्पादनामध्ये माल्टोडेक्स्ट्रिन असल्याने हा दावा खोटा ठरू शकतो. तसेच या उत्पादनात कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी आणि के२ साठी १००% आरडीएचे दावेदेखील नियमांशी विसंगत असल्याचे आढळले आहे.
सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी महापौरांनी "शाडू बाप्पा दहा दिवस – ...
FSSAI ने हॉर्लिक्स मदर्स प्लस केसरच्या ४०० ग्रॅम पाकबाबतही नोटीस जारी केली आहे. हे उत्पादन गरोदरपण आणि स्तनपानाच्या काळातील पोषणाशी संबंधित आहे. नियमकाच्या मते, पॅकेजवरील 'निरोगी जन्म वजन' आणि जाहिरातीमधील 'बाळाच्या निरोगी जन्म वजनासाठी' हे आणि यांसारखे दावे खोटे असल्याचे आढळले आहे. तर नेस्ले इंडियाच्या नेस्कॅफे रेडी टू ड्रिंक उत्पादनांबाबतीतही अनियमितता आढळून आल्या आहेत. यामध्ये नेस्कॅफे इंटेन्स कॅफे कॅप्यूचिनो, नेस्कॅफे चोको मोको आणि नेस्कॅफे चिल्ड लाटे यांचा समावेश आहे. या प्रकरणी नेस्ले इंडिया आणि इतर उत्पादक, श्रेबर डायनॅमिक्स डेअरीज व लोटस डेअरी प्रॉडक्ट्स यांच्याकडून प्रतिसाद मागवण्यात आला आहे.