स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

Ind vs Zim T20 Match: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय मिळवून ही मालिका खिशात टाकली.

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय मिळवून ही मालिका खिशात टाकली. स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारताचा हा पहिला विजय आहे. नुकतीच तिने हरमनप्रीत कौर कडून भारतीय महिला टीमचे कर्णधार पदाची सुत्रे हाती घेतले आहे. स्मृतीने कर्णधार पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच मालिकेत भारताने दणदणीत विजय मिळवला.


दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणे फेकीचा कौल, झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्विकारली. पण, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. झिम्बाब्वेने 20 षटकात 8 गडी गमवून 102 धावा केल्या आणि विजयासाठी 103 धावांचं आवाहन ठेवलं. हे आवाहन भारताने एक गडी गमावता पूर्ण केलं. शेफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मंधानाच्या जबरदस्त खेळीने काही वेळातच टी 20 क्रिकेट सामना भारताने जिंकला.



झिम्बाब्वेचा डाव


झिम्बाब्वेकडून चीपो मुगेरी-तिरिपानोने सर्वाधिक 32 चेंडूंत 34 धावा केल्या, तर कर्णधार जोसेफीन नकोमोने नाबाद 27 धावांचे योगदान देऊन संघाला शंभरचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून निकी प्रसादने अवघ्या 2 षटकांत 7 धावा देऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले, तर दीप्ती शर्मा, क्रांती गौड, श्री चरणी आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. भारतीय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत झिम्बाब्वेच्या खेळाडूंना धावबाद देखील केले. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर त्यांच्या फलंदाजांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना निर्धारित 20 षटकांत 102 धावांवरच समाधान मानावे लागले.



टीम इंडियाची दमदार खेळी


झिम्बाब्वेने दिलेल्या 103 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माने अवघ्या 25 चेंडूंत 6  चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 55 धावांची वादळी अर्धशतकीय खेळी केली. तर दुसरीकडे, उपकर्णधार स्मृती मंधानाने 25 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 47 धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा फलंदाजीला आली. ती 1 धाव करून नाबाद राहिली. 9 व्या षटकातच 1 बाद 103 धावांवर पोहोचवून विजय निश्चित केला.



सामन्यातील विक्रम


या ऐतिहासिक विजयामुळे भारत महिला संघाने 2026 या कॅलेंडर वर्षात आपला 17 वा टी-20 विजय नोंदवून एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा स्वतःचा नवा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय, 100 पेक्षा जास्त धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 67 चेंडू शिल्लक ठेवून मिळवलेला हा विजय महिला टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी ठरला आहे. फलंदाजीमध्ये भारतीय खेळाडू शफाली वर्माने 2026 या एकाच वर्षात सर्वाधिक 9 अर्धशतके (50+ धावा) आणि 922 धावा फटकावून जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
Comments
Add Comment

टीम इंडियाच्या मालिका विजयाचं गणित पावसामुळे भंगलं, पण कर्णधार श्रेयस अय्यरला मिळालं खास मेडल; कारण..

[caption id="attachment_1067421" align="aligncenter" width="800"] भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. पण या

INDW vs ZIMW: स्मृती मंधाना आणि शफाली वर्माकडे टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1067409" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे महिला संघातील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टी20

IND vs WI : भारत वेस्ट इंडिज मालिकेचा नकोसा शेवट, भारताने 7.4 षटकात 118 धावा करूनही सामना ड्रा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. चार सामन्यानंतर 2-2 अशी स्थिती होती.

महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्स मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, IPL 2027 च्या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षकपदाचा शर्यतीत कोण?

मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने

IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! श्रीलंकेचा हा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त

IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1