INDW vs ZIMW: स्मृती मंधाना आणि शफाली वर्माकडे टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात कर्णधार स्मृती मंधाना आणि शफाली वर्माच्या रडारवर एक विक्रम आहे. टी20 मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात हा विक्रम रचण्याची संधी आहे.
October 18, 2026 01:06 PM
1/5 भारत आणि झिम्बाब्वे महिला संघातील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने सहज विजय मिळवला होता. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा मानस आहे. या सामन्यात स्मृती मंधाना आणि शफाली वर्माचं लक्ष्य एका विक्रमावर आहे. (Photo: ANI)
2/5 भारताची ओपनर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्याकडे टी20 मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात एक विक्रम रचण्याची संधी आहे. हा विक्रम एकत्र नाही तर, वेगवेगळा असणार आहे. म्हणजेच दोघंही आपल्या नावावर वैयक्तिक विक्रम रचण्याची शक्यता आहे. (Photo: ANI)
3/5 स्मृती मंधानाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा पल्ला गाठण्याच्या अगदी जवळ आहे. स्मृती मंधानाने पुढच्या दोन सामन्यात 124 धावा करताना पुरूष आणि महिला क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी पहिली बॅटर ठरेल. स्मृती मंधानाने 180 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4876 धावा केल्या आहेत. (Photo: ANI)
4/5 शफाली वर्माच्या रडारवरही एक विक्रम आहे. जर तिने उर्वरित दोन सामन्यात 133 धावा केल्या तर महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारी पहिली बॅटर ठरेल. शफाली वर्माने या वर्षात खेळलेल्या 25 सामन्यात 867 धावा केल्या आहेत. (Photo: ANI)
5/5 झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा काही खास करू शकले नव्हते. दोन्ही फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. स्मृती मंधाने 9 तर शफाली वर्मा 4 धावा करून बाद झाले होते. (Photo: ANI)