Sunday, October 18, 2026

Koffee With Karan 9: रश्मिका विजयच्या पाठी लग्नासाठी हात धुवून लागलेली, स्वत: अभिनेत्रीनेच केला शॉकिंग खुलासा

'कॉफी विथ करण'च्या नऊव्या सीझनमध्ये विजय- रश्मिकाने हजेरी लावली होती. यावेळी करणने सर्वात आधी कोणी कोणाला लग्नासाठी प्रपोज केला? असा सवाल विचारला.

मुंबई: करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो, 'कॉफी विथ करण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या ह्या शोचा नऊवा सीझन सुरू आहे. गेल्या एपिसोडमध्ये शोमध्ये, सलमान खान आणि करिश्मा कपूर आले होते. त्यानंतर आता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा येणार आहे. काही तासांपूर्वीच पुढच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. रश्मिका आणि विजय हे दोघंही, 'रणबाली' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हे बॉलिवूड कपल या शोमध्ये आले होते. करणने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रश्मिकाने विजयला लग्नासाठी वर्षभरात 100 हून अधिक वेळा प्रपोज केल्याचा खुलासा केला आहे. ह्या खुलासामुळे सर्वच अचंबित झाले.

जियो हॉटस्टारच्या सोशल मिडिया पेजवर पुढच्या एपिसोडचा टीझर करण्यात आला आहे. 1 मिनिट 5 सेकंदाच्या शेअर केलेल्या टीझरमध्ये, करणने रश्मिका- विजयला कोणी कोणाला लग्नासाठी विचारलं? असा प्रश्न विचारला. विजयने रश्मिकाला लग्नासाठी गेल्या वर्षभरात 100 हून अधिक वेळा मागणी घातल्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे. प्रोमोमध्ये, रश्मिका- विजयची एन्ट्री होताना दाखवली आहे. हे स्टार कपल फॅन्सला फ्लाईंग किस देत एन्ट्री घेतं. शिवाय, आपल्या कातील हास्याने लाखो तरूणांच्या मनामध्ये घर केलेल्या रश्मिकाने क्यूट स्माईल देत सर्वांचेच लक्ष वेधले. नॅशनल क्रश म्हणून आजही रश्मिकाला तिचे लाखो चाहते म्हणतात. शोमध्ये, "जेव्हा तुझ्या आयुष्यात इतकी सुंदर व्यक्ती आली... त्यावेळी तू तिला लग्नाची मागणी घातली होती का?", असा प्रश्न करणने विजयला विचारला.

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विजय म्हणाला की, "मला रश्मिका म्हणाली की, चल आपण लग्न करूया. तर मी म्हणालो ठीक आहे, तिने मला लग्नासाठी शंभर वेळा लग्नासाठी विचारलं होतं." विजयने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले. त्यानंतर करणने रश्मिकाला, "तू खरंच विजयला लग्नासाठी शंभर वेळा विचारलंस?" त्यावेळी रश्मिका म्हणाली की, "हो, मी त्याला वर्षभर लग्नासाठी विचारत होते." हे ऐकून करण विजयकडे रागाने पाहतो.पुढे, करणने शोमध्ये रश्मिका- विजयसोबत रॅपिड फायर गेम सुद्धा खेळला. करण रश्मिकाला विचारतो, "अल्लू अर्जुन की रणबीर कपूर?" रश्मिका अल्लू अर्जुनचे नाव घेते. त्यानंतर करणने विजयला विचारलं, "रश्मिका व्यतिरिक्त, तुझ्या मते तुझी ऑन- स्क्रीन केमिस्ट्री कोणासोबत सर्वात चांगली आहे?" यावर विजयने चतुराईने उत्तर दिले, "कोणीही नाही. लग्नाचा नियम क्रमांक 101: नेहमी आपल्या पत्नीचे ऐका."

त्यानंतर शोमध्ये बझर राऊंड गेम खेळतात. ज्यामध्ये रश्मिका- विजयला प्रश्न विचारला जातो. या प्रश्नोत्तर सत्रात, 'रेबेल स्टार' आणि 'रॉकिंग स्टार' यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या चाहत्यांनी दिलेल्या उपाधींची उत्तरे द्यायची असतात. प्रोमोमध्ये, करण जोहर विजय आणि रश्मिकाला सांगतो की, दोघांनाही प्रत्येकी एका सेलिब्रिटीला फोन करायचा आहे. विजयने अल्लू अर्जुनला फोन केला आणि 'पुष्पा' अभिनेता फोन उचलून, शोच्या फॉरमॅटनुसार म्हणतो, "हे करण, मी बोलतोय." यासाठी विजयला 5 गुण मिळतात. शेवटी, करण जोहर 'हॉर्निमन सर्कल' या शब्दाचा उल्लेख करतो, ज्याचा रश्मिका चुकीचा अर्थ लावते. दरम्यान, विजय- रश्मिका आलेल्या 'कॉफी विथ करण सीझन 9'चा पुढचा एपिसोड येत्या बुधवारी, 21 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता, Jio Hotstar या ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा