DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही
कार्यपूर्ती अहवाल प्रसिद्ध करण्याची हिंमत काम करणाऱ्यांकडेच
October 18, 2026 08:14 PM
Twitter/x
अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल प्रसिद्ध केला आहे. काम केले असेल तरच कार्यपूर्ती अहवाल छापण्याची हिंमत होते. सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असून, शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.(EKNATH SHINDE)
अमरावती येथे सरनाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अंबामातेचे दर्शन घेऊन आपण अमरावतीत आलो असल्याचे सांगत शिंदे यांनी उपस्थित मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, महायुतीचे पदाधिकारी आणि शिक्षकांचे स्वागत केले.
सरनाईक यांनी मतदारसंघातील प्रत्येक शाळेला भेट देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यांचा वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल आणि पुढील कामांचा कृतीनिश्चय आहे, असे शिंदे म्हणाले.
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील उत्तर कोलकाता येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर आली ...
जुन्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न, दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांशी संबंधित परीक्षा व सेवाशर्तींचे प्रश्न सरकार सकारात्मकतेने सोडवेल. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार न देता त्यांना अध्यापन आणि विद्यार्थी घडविण्यावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अल्पसंख्याक शाळा, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित प्रश्नांवरही सरकार काम करेल, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, दुष्काळ जाहीर करून शासनाच्या सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. “सत्कार करण्याची वेळ नाही, बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे,” असे ते म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना महायुती सरकार सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला आणि शिक्षकांसाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचा आवाज सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी हक्काचा शिक्षक आमदार आवश्यक आहे. त्यामुळे 23 ऑक्टोबरला किरण सरनाईक यांना मतदान करून त्यांना विजयी करा, असे आवाहन शिंदे यांनी केले.(KIRAN SARNAIK)
अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ...
“दसऱ्याच्या सीमोल्लंघनापूर्वीच तुम्ही आज राजकीय सीमोल्लंघन केले आहे. दिवाळीपूर्वी सरनाईक यांच्या विजयाचे फटाके फोडायचे आहेत,” असे सांगत निकालाच्या दिवशी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण अमरावतीत उपस्थित राहू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
यावेळी आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय कुटे आमदार किशोरआप्पा पाटील, युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार ॲड. प्रीती रेवणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे, शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख सुनील डीके, अमरावती शहरप्रमुख संतोष भदे, सह - संपर्कप्रमुख श्याम देशमुख आणि शिवसेनेचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.